तुम्ही सरड्याबद्दल ऐकले असेल की हा प्राणी क्षणार्धात रंग बदलतो, पण तुम्ही कधी एखाद्या कारबाबत असे ऐकले आहे का जी सरड्यासारखी क्षणार्धात रंग बदलते….होय आम्ही कार बद्दलच सांगत आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही हे आम्हाला माहित आहे पण हेच सत्य आहे. सध्या सोशल मीडियावर रंग बदलणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्व लोक आश्चर्यचकीत होत आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आतापर्यंत १ कोटी ४० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

सरड्यासारखा रंग बदलते ही कार

हा InsaneRealitys नावाच्या ट्विटर अकाऊंवटवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे गाडीचा पांढरा रंग राखडी रंगामध्ये बदलतो. पापणी लवेपर्यंत दुसरी कार आली असा भास होतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर्मन लग्झरी कार कंपनी बीएमडब्लूने अशी कार तयार केली आहे जी क्षणार्धात रंग बदलू शकते. ही गाडी पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आवाक् झाले आहे.

हेही वाचा – Zomatoवर आता एकाच वेळी वेगवेगळ्या रेस्तरॉंमधून करू शकता ऑर्डर, कसे ते जाणून घ्या

हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ कंपनीची खास ऑफर, कर्मचाऱ्यांना प्रत्येक मुलासाठी मिळणार तब्बल ‘इतके’ लाख!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

BMW ने एका प्रदर्शनादरम्यान लोकांना माहिती दिली होती की त्यांनी आपल्या सर्व iX इलेक्ट्रिक कारमध्ये नाविन्यपूर्ण पेंट स्कीम कलर चेंजचा पर्याय दिला आहे. यामध्ये एक विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे १ बटण क्लिक करताच रंग बदलते.