तुमचा आवडता खेळाडू तुमच्या समोर आला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? अर्थाथच तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. मनात गुदगुल्या निर्माण होतील. आनंदाच्या उकळ्या फुटतील. कोणत्याही चाहत्याला किंवा चाहतीला आपल्या व्यक्ती पाहून ही भावना जाणवू शकते. गुजरात टायटन्सचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलचे लाखो तरुण-तरुणी चाहते आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचे अनेक व्हिडीओ व्हिडीओ पोस्ट होत असतात. सध्या अशाच शुभमन गिलच्या चाहतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शुभमन गिलला पाहताच त्याच्या चाहतीने जी प्रतिक्रिया दिली आहे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चाहतीच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

गुजरात टायटन्सने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये शुभमन गिलचे टाळ्यांच्या कडकडाटात एका हॉटेलच्या लॉबीतून फिरताना दिसत आहे. सर्वच चाहते त्याला पाहून उत्साही झाले आहे पण एका चाहतीची प्रतिक्रियने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral

हेही वाचा –“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच

ही तरुणी शुभमनला पाहून आनंदाने भारावून गेली आहे. या चाहतीला तिचा उत्साह आवरता आला नाही. जेव्हा शुभमन गिल जेव्हा तिच्या समोरून जातो तेव्हा तीला विश्वास बसत नाही. अविश्वासाने ती हृदयाजवळ हात घट्ट धरून बसलेला दिसत आहे. बॅकग्राऊला ‘गुंडे’ चित्रपटातील आकर्षक ट्यून “तुने मारी एंट्रीयान” गाणे वाजताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गिल ने मारी एंट्री यार…” व्हिडीओ गिलच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आनंदीत झाले आहे. अनेक युजर्सनी एकाच वेळी व्हिडिओवर “ही मी आहे” अशी कमेंट केली.

हेही वाचा – न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

IPL 2024 सिझनमध्ये खूप चढ-उतार असूनही गुजरात टायटन्सने गिलच्या नेतृत्वाखाली तीन वेळा विजय मिळवले आणि तीन वेळा पराभवाचा सामना केले. संघाचा प्रवास रोलरकोस्टर राईड प्रमाणे होता. सध्या आयपीएलच्या पॉइंट टेबलवर सहाव्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सची स्पर्धात्मक भावना संपूर्ण स्पर्धेत दिसून आली आहे.