डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप समजलं जातं. अनेकदा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध केवळ व्यावसायिक नसून जिव्हाळ्याचे होतात. डॉक्टर -पेशंटचे संबंध संवाद खुप महत्त्वाचा आहे. कारण त्याचा पेशंटच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो.हे संबंध म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा पाया आहे.उत्कृष्ट आरोग्य सेवा,उपचार प्रक्रिया हे सर्व या संबंधांवर अवलंबून आहे. आपण असे अनेक किस्से एकले असतील की रुग्णांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत, कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या महिला रुग्णाने डॉक्टरांनी केलेल्या मदतीसाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हालाही आनंद होईल. अशीही कृतज्ञता - पी कामथ या डॉक्टरांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर स्वत:ही पोस्ट शेअर केली आहे. डॉ कामथ हे मंगळुरू येथील केएमसी हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजीचे प्राध्यापक आणि प्रमुख आहेत. त्यांना त्यांच्या एका रुग्णाने सुक्या मेव्याचे बॉक्स भेट म्हणून दिले आहे. त्याबद्दल त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. ते कॅप्शनमध्ये म्हणतात की, गेल्या दशकभरापासून त्यांची एक पेशंट होती. मात्र त्यांनी कधीच तिच्याकडून उपचाराचे पैसे घेतले नाही. ती एका बँकेत मदतनीस म्हणून काम करत असून तिच्या परिस्थितीची कल्पना असल्यानं त्यांनी कधीच तिच्याकडून फी घेतली नाही. दरम्यान याबद्दलच कृतज्ञता म्हणून ती त्यांच्या क्लिनीकमध्ये येते आणि त्यांना सुका मेव्याचा बॉक्स गिफ्ट आणि शुभेच्छा देते. यावेळी ती मी पेशंट म्हणून नाही तर आज माझा बँकेत शेवटचा दिवस आहे तुम्ही आतापर्यंत केलेल्या मदतीबद्दल मी आभारी आहे.असं म्हणत डॉक्टरांचे आभार मानते. पाहा पोस्ट - हेही वाचा - Video: महामार्गावर अपघाताचा थरार; भरधाव कारचा टायर फुटला अन्.. या पोस्टला आतापर्यंत १० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.