तुम्ही आतापर्यंत मैदानात, जुहू बीचवर, किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक तरुण मंडळींना फूटबॉल खेळताना पाहिलं असेल. पण, तुम्ही कधी कोणाला घराच्या गच्चीवर फूटबॉल खेळताना पाहिलं आहे का ? नाही. तर सोशल मीडियावर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे तीन तरुण घराच्या गच्चीवर फूटबॉल खेळताना दिसले आहेत. हे पाहून प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तीन तरुण फूटबॉल खेळत आहेत. पण, यांची खेळाची पद्धत थोडी वेगळी आहे. घराच्या गच्चीवर हा सामना खेळला जातो आहे. म्हणजेच एक तरुण फूटबॉल किक करून दुसऱ्या तरुणाच्या गच्चीच्या दिशेने फेकतो. तिकडे दुसरा तरुण सुद्धा हा फूटबॉल अगदी सहज झेलून तिसऱ्या तरुणाकडे त्याच पद्धतीत पास करतो. त्यानंतर तिसरा तरुण पुन्हा पहिल्या तरुणाकडे पाठवतो. एकदा तुम्ही सुद्धा बघा हा गच्चीवर रंगलेला फूटबॉल सामना.

हेही वाचा…‘ती’ ही माणसंच! हॉटेलमध्ये वेटरला ग्राहकाने दिले टीपपेक्षा मोठी भेट; बिलाचा तो Video पाहून म्हणाल ‘भारीच’

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तिन्ही तरुण स्वतःच्या घराच्या गच्चीवर उभे आहेत. प्रत्येकजण फूटबॉल खळताना एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर फूटबॉल एकमेकांना पास करत आहेत ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तर देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ पहिला व त्याच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून रिपोस्ट केला. फूटबॉल खेळणाऱ्या तरुणांचे कौतुक केले आहे आणि म्हंटल आहे की, ‘व्वा याला म्हणतात कौशल्य’ .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या @hvgoenka एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. फूटबॉल खेळाचा तरुणांचा सराव पाहून नेटकरी विविध शब्दात कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तसेच या अनोख्या फुटबॉल सामन्याने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.