अनेकदा आपण कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये जेवायला जातो. तिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट टेबलावर आणून दिली जाते. आपण हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर पाणी देण्यापासून ते प्रत्येक ऑर्डर नम्रपणे स्वीकारण्यापर्यंत तेथील वेटर दिवसरात्र ग्राहकांच्या सेवेत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये हॉटेलमधील वेटरच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी एक ग्राहक टीप न देता एक खास भेटवस्तू देतो.

आकाश नावाचा इन्स्टाग्राम युजर एका हॉटेलमध्ये जातो. तिथे एक मेहनती वेटर ज्याला चालण्यात थोडी समस्या येत असूनसुद्धा तो हॉटेलमध्ये काम करत असतो. तर हे पाहून युजरला एक कल्पना सुचते. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर तो त्याच्याकडे बिल मागवतो. या बिलावर युजर पेनाने या वेटरचे छान चित्र काढतो आणि त्याला द्यायला जातो, तेव्हा वेटर काउंटरच्या इथे बिल देण्यास सांगतो. वेटरने हे बिल पाहिलं की नाही हे तुम्हीसुद्धा एकदा व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…वीस वर्षांचा ‘तो’ प्रवास… मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

सुरुवातीला वेटर गोंधळून बिल घेण्यास नकार देतो. पण, दुसऱ्यांदा जेव्हा तो बिल पाहतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. कारण व्यक्तीने बिलावर वेटरचे हुबेहूब सुंदर चित्र काढलेले असते. चित्र इतके अप्रतिम असते की, वेटर हॉटेलमधील त्याच्या सहकारी मित्राला ते दाखवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @imaginelife_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे अप्रतिम चित्र काढणारा ग्राहक आकाश हा एक स्ट्रीट आर्टिस्ट आहे. आपल्या कलेतून तो इतरांना आनंद देत राहतो. याआधीसुद्धा त्याने अनेक लोकांचे असे अप्रतिम चित्र काढले आहे. तर आज त्याने एका वेटरचे चित्र काढले, जे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसते आहे