लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरत असताना नागरिक अनेकदा घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. नेहमीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या जातात. मात्र, असे असतानाही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक प्रकार मुंबईच्या वडाळा स्टेशनवरुन समोर आला आहे. मुंबईच्या वडाळा स्टेशनवरील तिकीट कलेक्टरने आपल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेने एका ज्येष्ठ महिलेचा जीव वाचला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेने शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की, सतर्क रेल्वे अधिकारी एका ज्येष्ठ महिला नागरिकाच्या मदतीसाठी धावून आले. जी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मदरम्यान पडली. रेल्वे स्थानकावरील इतर लोकांनीही महिलेला मदत केली. ज्येष्ठ महिलेचे प्राण वाचवणाऱ्या तिकीट कलेक्टरचे (टीसी) मध्य रेल्वेचे सुधीर कुमार मांझी असे नाव आहे. साधना पठाणे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. वृद्ध महिलेच्या मुलीने सतर्क रेल्वे अधिकाऱ्याचे आभार मानले. या व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची नेहमीची गर्दी दिसत आहे. मात्र, ट्रेन धावायला लागल्यावर एक वृद्ध महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतराच्या अगदी जवळ पडली. यावेळी तिकीट कलेक्टर महिलेच्या मदतीला धावून आला, आणि महिलेचे प्राण वाचवले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – भर उन्हात सापाला पाणी पाजून दाखवत होता माणुसकी; Video पाहून उडेल थरकाप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नटकऱ्यांनी या तिकीट कलेक्टरचे कौतुक केले आहे. तसेच प्रवाशांनी उशीर झाला तरी चालेल मात्र धावत्या लोकलमध्ये चढू नये असे आवाहन करण्यात आले आहे.