Delhi Metro Women Fight:  दिल्ली मेट्रो अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. यात मेट्रोमधील प्रवाशांमध्ये सीट्सवरून झालेल्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे असताना पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे. यावेळेस दिल्ली मेट्रोत दोन महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या दोन महिलांचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

दोन महिलांमध्ये एका सीटवरून झालेल्या वादाचे काही वेळाने चक्क हाणामारीत रुपांतर झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिलांमध्ये शाब्दिक वाद सुरू आहे. यावेळी दोघी एकमेकींवर रागाने ओरडताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहेत. यावेळी यातील एक महिला सीटवर बसलेल्या महिलेला ‘मी कोण आहे माहितीय का’, असा सवाल करत ‘आता तुला तिहार जेलमध्ये पाठवते’, अशी धमकी देताना दिसतेय. यावेळी आजूबाजूचे लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, दोघीही कोणाचंही ऐकण्यास तयार नव्हत्या. एक महिला दुसऱ्या महिलेला धक्का देते, यानंतर दोघींमध्ये हाणामारी होते.

पोट भरण्यासाठी पोळी नळाखाली भिजवली अन्…; भुकेलेल्या व्यक्तीचा मन हेलावणारा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, ही घटना कधी आणि कोणत्या मार्गावर घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन लाजिरवाणे असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे.