टिकटॉक 'ब्लॅकआउट चॅलेंज'मुळे झाला २० मुलांचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या | Tiktok blackout challenge responsible for death 20 children in past 18 months know more about it | Loksatta

टिकटॉक ‘ब्लॅकआउट चॅलेंज’मुळे झाला २० मुलांचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

२० मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे ब्लॅकआउट चॅलेंज काय आहे जाणून घ्या

टिकटॉक ‘ब्लॅकआउट चॅलेंज’मुळे झाला २० मुलांचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या
सध्या चर्चेत असणारे ब्लॅकआउट चॅलेंज काय आहे जाणून घ्या (प्रातिनिधिक फोटो)

लहान मुलांना ऑनलाईन गेम्समधील चॅलेंज, खेळ यांचे सर्वाधिक आकर्षण असते. त्या गेम्समधील चॅलेंजेस कळो अथवा नको, पण ते सतत पाहत राहणे याचे लहान मुलांना जणू व्यसन लागले आहे. काही लहान मुलं या गेम्सशिवाय जेवतही नाहीत त्यामुळे त्यांच्या हट्टापुढे पालकांनाही माघार घ्यावी लागते. पण या ऑनलाईन गेम्सच्या व्यसनामुळे मुलांच्या जीवावर बेतु शकते. याचेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे, टिकटॉकवरील एका चॅलेंजमुळे २० मुलांचा मृत्यू झाला आहे.

ब्लुमबर्ग या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार टिकटॉकवरील ‘ब्लॅकआउट चॅलेंज’मुळे २० मुलांचा मृत्यू झाला आहे. या मुलांमधील किमान १५ मुलांचे वय १२ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे. या चॅलेंजमध्ये घरातील वस्तुंच्या मदतीने स्वतःला गुदमरून घेण्यास आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले जाते. या चॅलेंजमध्ये मोठ्या प्रमाणात मुलं सहभाग घेत आहेत, ज्या मुलांचा मृत्यू झाला त्या मुलांनी बेशुद्ध होईपर्यंत स्वतःला गुदमरण्यचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

गेल्या १८ महिन्यांमध्ये ‘ब्लॅकआउट चॅलेंज’मुळे २० मुलांचा मृत्यू झाला आहे. टिकटॉकने या गोष्टींची दखल घेत सेफ्टी टीमकडुन याबाबत दखल घेण्यात आली असून, याबाबत या चॅलेंजमध्ये कमी वयाच्या मुलं सहभागी झाल्याने, त्यांना याबाबत कल्पना नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 12:40 IST
Next Story
पोलिस कोठडीत चाललेली कैद्यांची दारू-पार्टी; दोन पोलिस ताब्यात