जगभरात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या विचित्र आयडियांनी सर्वांनाच अवाक् करतात. सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. कोण कशापासून काय बनवेल आणि कसा जुगाड करेल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर तर असे अनेक जुगाडू पहायला मिळतात. त्यांचे अनेक हटके जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका जुगाडूचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उन्हाळा सुरु झाला आहे, त्यात घामाच्या धारा वाहत आहेत. यावरच एका व्यक्तीनं भन्नाट जुगाड शोधून काढला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कंस्ट्रक्शन साईड परिसरात आराम करीत आहेत. विशेष म्हणजे तिथं पंख्याची व्यवस्था नाही. त्या व्यक्तीला अधिक गर्दीचा अधिक त्रास होत असल्यामुळे, त्याने ड्रिल मशीनपासून पंखा तयार केला आहे. त्या व्यक्तीने ड्रिलिंग मशीनला लोखंडी रॉडला उलटे टांगून त्यात टी-शर्ट अडकवला आहे. मशीन सुरू केल्यानंतर आणि मशीनचा पुढचा भाग फिरु लागतो, त्यावेळी बांधलेला शर्टही पंख्यासारखा फिरत आहे. शर्ट पंख्यासारखी हवा देत आहे. असे जुगाड करण्याच्याबाबतीत भारतीयांचा कुणीही हात धरु शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: ’24 कॅरेट’ सोन्याची कुल्फी खाल्लीये का कधी? किमंत ऐकुनच भरेल हुडहुडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा देसी जुगाड पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून युजर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  त्या व्हिडीओला आतापर्यंत एक करोड लोकांनी पाहिलं आहे. चार लाख लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी डोकं धरलं आहे. समजा ही मशीन खाली पडली, तर त्या मुलाचं काय होईल अशी एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.