“मुलं ही देवाघराची फुलं असे म्हणतात”. खरचं लहान मुलं ही अत्यंत निरागस असतात ज्यांना फक्त आयुष्याचा आनंद घेता येतो. बालपणी आपण जितके बिनधास्तपण जगतो तसे मोठे झाल्यावर जगता येत नाही याची खंत आपल्याला नेहमी वाटत असते. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो पण तो आनंद घेता आला पाहिजे. लहान मुलांना ती कला उत्तम जमते. सध्या अशा चिमुकल्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जे आयुष्याचा खरा आनंद घेत आहे. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा हे त्यांच्याकडून प्रत्येकांने शिकले पाहिजे.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर jioji_jioni_ या अकांउटवर पोस्ट केला जातो. व्हिडीओमध्ये दोन लहान चिमुकले दिसत आहे जे घरातच बादलीच्या पाण्यामध्ये खेळत आहे. एकमेकांच्या आणि स्वत:च्या अंगावर पाणी ओतून हे मुलं मज्जा करत आहे. चिमुकल्यांनी घरात पाणीच पाणी केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चिमुकल्यांचा आंनद पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. इंस्टाग्रामवरील @steffistanley.art या अकांउटवरही त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोघांचा पाण्यात भिजतानाचा आनंद चित्रात रेखाटला आहे. चित्रामध्ये मुलांचा निरागसपणा स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा – २०२३मध्ये ‘या’ हटके हेअरस्टाइलला महिलांनी दिली पसंती; रुबाबदार पुरुषांची पहिली पसंत ठरली ‘ही’ हेअरस्टाइल

हेही वाचा – धक्कादायक! तब्बल १५ वर्षे डोळ्यात लाकडी कूस घेऊन जगत होती व्यक्ती!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. आयुष्यात आनंदी कसे राहायचे हे या चिमुकल्यांना पाहून लक्षात येते. व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहींनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आई चिडणार असे सांगितले तर काहींना स्वत:चे बालपण आठवले. एकाने कमेंट केले की, “आईसाठी हे वाईट स्वप्न असू शकते” दुसऱ्याने म्हटले, “मला बालपणीच्या दिवसांची खूप आठवण येते.”