Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाचा लागतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात, अनेक चढ-उतारही येतात. इतके संघर्ष, चढ-उतरांसह आयुष्य जगायचे तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडत असतो. मात्र हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल आणि आपण किती सुखी आहोत याची जाणीवही होईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला भर पावसात रस्त्यावर हार विकताना दिसत आहे. एवढ्या लहान वयात आलेली जबाबदारी हा चिमुकला चोख पार पडत आहे. या वयात काही मुलं स्वत:च्या हाताने जेवायलाही नाही म्हणतात. मात्र हा चिमुकला एवढ्या कमी वयातही घरच्यांना मदत करताना दिसत आहे. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, तर असंख्य धडे हे आयुष्य शिकवत असतं. याचंच उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. खेळण्याच्या वयात, आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे. आई वडिलांना मदत करताना खारीचा वाटा उचलत आहे. या वयात मुले शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात, त्या वयात हा चिमुकला काम करत आहे.
आपल्याला माहिती आहे आजकालची पिढी ही खूप स्मार्ट आहे. आजच्या पिढीला संघर्ष काय हेच माहिती नाहीये. किंबहुना त्यांना संघर्ष करायचाच नाहीये. मात्र आपल्या आजू-बाजूला अशीही काही उदाहरणं आहेत जी पाहून आपल्याला वस्तूस्थितीची जाणीव होते. हा व्हिडीओ प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना दाखवला पाहिजे, आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी सहज मिळतात त्यामुळे त्याची किंमत त्यांना कळत नाही. मात्र आजूबाजूला अशीही मुलं आहेत ज्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे.
पाहा व्हिडीओ
चिमुकल्याची ही धडपड आणि कष्टाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.