Accident Viral Video: अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. ट्रॅक्टरचा हा अपघात इतकी भीषण होता की ट्रॅक्टर थेट विहीरीत पडला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण झाला आहे की, रस्त्यावर अपघात झाल्यानंतर हा ट्रॅक्टर बाजूला असणाऱ्या शेतात गेला. त्यानंतर पुढे तो ट्रॅक्टर थेट विहीरीत जाऊन पडतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रॅक्टरचा अर्धा भाग विहीरीत पडला आहे तर अर्धा भाग विहिरीच्या काठाला अडकला आहे. आजूबाजूला बाजूच्या गावातले लोक जमलेले दिसत आहेत. यावेळी ड्रायव्हरही जखमी झाला असल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C6P6ddRqacv/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा >> प्रसिद्धीची हाव! बाप की हैवान? बाळाला घेऊन हजारो फूट उंचावरुन उडी मारली, अंदाज चुकला अन्…थरारक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ shubham_605_lover नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. याची अनेक उदाहरणे रोज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये पहायला मिळतातच. मात्र हे कधीकधी जिवावर बेतू शकतं याचा विचार आजची तरुण पिढी करत नाही. ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडीओवर अनेकजण संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.