Pakistan Train Viral Video: भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई थांबण्याचे काही नाव घेत नाहीये. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खूपच वेगळ्या वळणावर आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. आपल्याला माहिती आहे की, पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. कधी महागाईमुळे तर कधी आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तो चर्चेत येत असतो. आता पाकिस्तानातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल…
पाकिस्तानची अवस्था सध्या कोणापासून लपलेली नाही. आर्थिक दिवाळखोरी आणि आता याच देशातील ‘रेल्वे व्यवस्था’ची दयनीय अवस्था सोशल मीडियावर उघड झाली आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानची ‘आवाम एक्स्प्रेस’ नावाची ट्रेन अक्षरशः चालतं भंगार वाटते. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, जो पाहिल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल.
पाकिस्तानातील ‘आवाम एक्स्प्रेस’ या रेल्वेची अवस्था इतकी भयावह आहे की, पाहणाऱ्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. या व्हिडीओत दिसतं की, ट्रेनमधल्या सीट्स काही ठिकाणी तुटलेल्या आहेत, काही तर गायबच आहेत. काही अशा अवस्थेत आहेत की त्यावर कोणताही माणूस बसायला धजावणार नाही. ट्रेनच्या डब्यांवर एवढा गंज चढला आहे की पाहून वाटतं जणू एखादं ऐतिहासिक अवशेष जपून ठेवलंय. फरशांवर कचरा, भिंतींमध्ये छिद्र आणि घाण वास या सगळ्यामुळे प्रवासी किती मजबुरीनं प्रवास करतायत, हे स्पष्ट जाणवतंय.
या दृश्यांमुळे लोक सोशल मीडियावर पाकिस्तानची जोरदार खिल्ली उडवत आहेत. खिळखिळ्या सीट्स, गंजलेली भिंत, कचऱ्याचा ढीग ही खरोखर प्रवाशांची ट्रेन आहे की एखादे पडके गोदाम? हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी पाकिस्तानची चांगलीच मौज घेतली आहे. कोणी म्हणतंय, “ही ट्रेन नाही, पाकिस्तानचं टायटॅनिक आहे!” तर कोणी म्हणतंय, “या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना वीरता पुरस्कार द्या!” एकाने तर उपहास करत लिहिलं, “रेल्वेचे हे हाल आहेत आणि कश्मीरचं स्वप्न पाहताय? आधी तुमच्या डब्यांना तरी दुरुस्त करा!”
हा व्हिडीओ @rajesh.chohan.5891 या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे आणि तो पाहून नेटिझन्सनी थेट पाकिस्तानच्या व्यवस्थेवर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे.
येथे पाहा व्हिडीओ
पाकिस्तानचा ढासळलेला पायाभूत विकास, जनतेची दु:खद अवस्था आणि त्यावरून सुरू असलेली सोशल मीडियावरची खिल्ली, यामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध होतं की, कंगाल देशात सुविधांची काय अवस्था असते याचा जिवंत पुरावा म्हणजे ही ‘आवाम एक्स्प्रेस’!
(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या दाव्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.)