viral video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा भांडणाचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. अशातच आता तृतीयपंथींयांचा एक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये त्यांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. उत्तर प्रदेशातील देवरिया सदर रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री उशिरा तृतीयपंथीयानी गोंधळ घातला. रेल्वे प्रवाशांकडून बेकायदेशीर पैसे वसूल करताना थांबवले म्हणुन तृतीयपंथीयांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) इन्स्पेक्टरवर हल्ला चढवला. या घटनेमुळे काही काळ संपूर्ण स्थानक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रवाशांच्या तक्रारीनंतर कारवाई

रात्री अवध–आसाम एक्सप्रेस गाडी देवरिया स्टेशनवर उभी असताना प्रवाशांनी आरपीएफ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की, काही तृतीयपंथीयांकडून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसुल केले जात आहेत. पैसे न दिल्यास ते शिवीगाळ करतात आणि प्रवाशांशी गैरवर्तन करतात, अशीही माहिती देण्यात आली. या तक्रारीनंतर आरपीएफ इन्स्पेक्टर आश मोहम्मद यांनी तृतीयपंथीयांना इशारा देत, अशा प्रकारे पैशांची उकळपट्टी चालू ठेवल्यास कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. इन्स्पेक्टरचा कठोर इशारा मिळाल्यानंतर तृतीयपंथीय आक्रमक झाले. थोड्याच वेळात त्यांनी एकत्र जमून स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रवाशांशी गैरवर्तन, आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर इन्स्पेक्टर आश मोहम्मद काही पोलिस साध्या वेशात कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

इन्स्पेक्टरवर हल्ला आणि कार्यालयात तोडफोड

गोंधळ घालणाऱ्या तृतीयपंथीयांनी अचानक इन्स्पेक्टरकडील काठी हिसकावून घेतली आणि त्यांच्यावरच हल्ला केला. काहींनी पाठलाग करून त्यांना मारहाण केली. अधिकारी अल्पसंख्य असल्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. एवढ्यावरच न थांबता संतप्त तृतीयपंथीय आरपीएफ कार्यालयात घुसले आणि तेथे तोडफोड केली. यामुळे काही काळ प्रवासी घाबरून गेले आणि स्टेशन परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

पाहा व्हिडीओ

प्रवासी व फेरीवाल्यांचे धाडस

या घटनेदरम्यान काही धाडसी प्रवासी आणि स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांनी पोलिसांच्या मदतीला धाव घेतली. त्यांनी हल्लेखोरांना आव्हान दिले, त्यानंतर तृतीयपंथीयांनी माघार घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे इन्स्पेक्टर आश मोहम्मद यांचे प्राण वाचले.

पोलिसांची पुढील कारवाई

गोंधळ शांत झाल्यानंतर तत्काळ जीआरपी पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शोधमोहीम राबवून दोन आरोपी तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.ही संपूर्ण घटना उपस्थित प्रवाशांनी मोबाईलवर रेकॉर्ड केली असून त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लोकांनी पोलिस दलाला मदत केल्याचे दृश्यही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.