scorecardresearch

Premium

VIDEO: “हीच तर सुंदरता आहे माझ्या देशाची”, बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा हटके डान्स

Viral video: बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा हटके डान्स

policemen dance Ganesh Visarjan video viral
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा हटके डान्स

Police dance viral video: गणेशांची सुंदर मूर्ती, गणेश भक्तांचा जोश आणि डीजेच्या तालावर थरकरणारे गणेशभक्त…सर्वत्र वातावरण अजून काही गणेशमय झालं आहे. गणेशभक्तांच्या भावनांचा सुंदर मेळावा आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओमधून पाहिला मिळतं आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात कोणी लहान नाही मोठं नाही, कुठल्या जातीधर्माचा नाही, सर्व कसे एका रंगात न्हाऊन निघतात.

दरम्यान सर्वत्र डीजेचा जल्लोष सुरु असताना बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनाही आपला डान्स करण्याचा मोह आवरला नाही.अखेरच्या मूर्तीचं विसर्जन पार पडल्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीमध्ये ठेका धरला. पोलिसांचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता महिला पोलीसही मोठ्या उत्साहात डान्स करताना दिसतं आहे. बंदोबस्ताच्या तणावानंतर थोड्या फार विरगुंळाचा हा क्षण पोलिसांनीही अनुभवला. मात्र सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर टीका केली आहे तर काही लोकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे.

Fire In Wedding Hall During Newlyweds Dancing 100 People Lost Life Many Injured Iraqi Middle East Video
VIDEO: लग्नसोहळा दु:खात बदलला; हॉलमध्ये आगीचा भडका, १०० वऱ्हाड्यांचा होरपळून मृत्यू, १५० जखमी
amchya papani ganpati anala song daddy trying to photoshoot little girl
“आमच्या पप्पांनी गणपती आणला…” बाळाच्या फोटोशुटसाठी पप्पांची धडपड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
shiv-thakare
शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला बाप्पा विराजमान; जंगी मिरवणूकीत ५० पोलिसांचा सहभाग
viral video on social media of petrol pump fire for small mistake of driver Trending
VIDEO: नजर हटी दुर्घटना घटी..! ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे अख्ख्या पेट्रोल पंपाला लागली आग

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: अजित पवारांनी वाजवला पुणेरी ढोल! दगडूशेठ बाप्पाच्या चरणी पवार लीन

पोलिसांनी गणवेशात असताना ठेका धरू नये

पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदार केले आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या उत्सवी माहोलमध्ये डिजेचा ताल भल्याभल्यांना नाचायला भाग पाडतो. त्यास पोलीस कसे अपवाद ठरणार. म्हणून पोलिसांनी गणवेशात असताना ठेका धरू नये. खाकीचे भान ठेवावे. बेधुंद होत पोलीस नाचत असल्याचे व्हिडिओ नेहमी पाहण्यात येतात. या अनुषंगाने तंबी देण्यात आली आहे. म्हणून गणवेशात नाचत असल्याचे व्हिडीओ व्हायरल करण्यास मनाई करण्याचे पत्रक काढण्यात आले आहे. मात्र हा व्हिडीओ जुना असून आता पुन्हा व्हायरल होत आहे. नेटकरीही व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Treading video 2023 maharashtra policemen dance ganesh visarjan video viral on social media srk

First published on: 27-09-2023 at 09:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×