जुन्या प्रेयसीचे लग्न ज्या मुलाबरोबर ठरलं त्या मुलाच्या घराबाहेर आग एका प्रियकराने लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका ३० वर्षीय तरुणाला सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘द स्ट्रेट्स टाईम्स’ने याबाबत बातमी दिली आहे. सिंगापूरमधील एका 30 वर्षीय युवकाने त्याच्या जुन्या प्रेयसीचं ज्या मुलाशी लग्न ठरलं होत त्यांच्या घराबाहेर आग लावली आहे.

हेही वाचा- प्रेम हेच असतं! घर विकलं, पैसे संपले तरीही मानली नाही हार, पतीच्या उपचारासाठी ‘ती’ रस्त्यावर उतरुन करतेय काम

सुरेनथिरन सुगुमारन असं या आरोपी युवकाचं नाव आहे. त्याच्या या कृतीमुळे इमारतीचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता होती त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेनथिरनला एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याच्या जुन्या प्रेयसीच्या लग्नाची माहिती मिळाली. त्यानुसार त्याच्या प्रेयसीचं लग्न मोहम्मद अजली मोहम्मद सालेह नावाच्या तरुणाशी ठरलं होतं.

हेही पाहा- रिलसाठी काहीही! पठ्ठ्याने चक्क टॉयलेट सीटवर चढून केला ‘पतली कमरिया’चा ट्रेंडिंग डान्स; पाहा मजेदार Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नाच्या एक दिवस आधी संतापलेल्या सुरेनथिरन याने अजलीच्या फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि त्याची गैरसोय करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरासमोर आग लावली. या घटनेनंतर स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, जिल्हा न्यायाधीश यूजीन टो यांनी शुक्रवारी सुरेनथिरनने केलेले कृत्य हे फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अतिशय धोकादायक असल्याचं सांगतं त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.