‘इच्छा तिथे मार्ग’ असं आपण नेहमी म्हणतो, त्यानुसार आपणाला जर एखादं काम करण्याची मनापासून इच्छा असेल तर, कितीही संकट आली तरी ते काम आपण पुर्ण करतोच. शिवाय कोणतंही काम करण्यासाठी केवळ जिद्द आणि इच्छा लागते असं म्हणतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहिल्यावर तुम्हाला आपण जिद्दीच्या जोरावर काहीही करु शकतो याचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही.

जर कधी आपल्या हाताला किंवा पायाला किरकोळ दुखापत झाली तर आपण एखाद काम कसं टाळता येईल याचा विचार करतो. पण जर तुम्हाला दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीने अवघड डोंगर सर केल्याच सांगितलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण सध्या दोन्ही पाय नसलेल्या एका व्यक्तीने डोंगरावर चढाई केल्याचा व्हिडीओ IPS ऑफिसर दिपांशू काबरा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीचे कौतुक तर केले आहे. शिवाय व्हिडीओतील व्यक्ती आमच्यासाठी एक प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

हेही पाहा- बहिण सायकलवरुन पडू नये म्हणून चिमुकल्या भावाची धडपड, हृदयस्पर्शी Video एकदा पाहाच

आयपीएस दीपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यापासून काहीही रोखू शकत नाही.’ व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोरीच्या सहाय्याने डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. या माणसाने गिर्यारोहकांची सुरक्षा उपकरणे परिधान केली आहेत. पण या व्यक्तीला दोन्हीही पाय नसल्यामुळे त्याने कृत्रिम स्टीलच्या पायांचा आधार घेत डोंगरावर चढण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही पाहा- ‘काळ्या जादू’द्वारे प्रेम मिळवून देतो सांगत अविवाहितांची लाखो रुपयांची फसवणूक; प्रेमासंबंधित मंत्रांचेही ठरलेले दर

व्हिडिओमध्ये हा व्यक्ती ज्या डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करत आहे तो खूप कठीण आहे. शिवाय पाय नसल्यामुळे या गिर्यारोहकाला वर चढण खूप अवगड जात आहे. पण तरीही तो हिंमत न हारता वरती चढताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ आत्तापर्यंत ३२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मनात विश्वास असेल तर शरीराची कमकुवतता अडथळा बनू शकत नाही’. तर आणखी एकाने लिहिलं आहे की, ‘अविश्वसनीय, पुढे जात राहा, मी तुम्हाला आणि तुमच्या स्वप्नांना सलाम करतो’. तर ’90 डिग्री चढाई, ग्रेट, मोटिव्हेशनल’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.