Truck driver Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. ज्यामध्ये लोक कधी काय करतील याचा नेम नसतो. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर आपल्याला हसू येते. तर असेही काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ट्रक चालक ट्रक चालवताना दिसत आहे. मात्र यावेळी ट्रकचालकाने उन्हापासून वाचण्यासाठी असा जुगाड केलाय की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एप्रिल महिन्यातच सूर्य इतकी आग ओकतोय की घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. त्यात ट्रकचालक दिवसभर ट्रक चालवत असतात. याच उकाड्यापासून बचावण्यासाठी ट्रक चालकानं हा जुगाड केला आहे. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

चालत्या ट्रकमध्ये केली आंघोळ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक ट्रक चालक ट्रक चालवताना दिसत आहे. सध्या भारतात उन्हाळा सुरू झाला आहे. दुपारची वेळ असून उन्हाचा प्रचंड तडाखा आहे. उष्ण वातावरणापासून बचाव करण्यासाठी ट्रकचालकानं असा जुगाड केलाय की तुम्ही त्याचा विचारही करु शकत नाही.ट्रक चालक उन्हापासून वाचण्यासाठी चक्क चालत्या ट्रकमध्ये आंघोळ करताना दिसत आहे.

ट्रक ड्रायव्हर शेजारी ठेवलेल्या बादलीतून पाण्याने मग भरतो आणि स्वतःवर ओततो. एक हात ट्रकच्या स्टेअरिंगवर आहे आणि दुसऱ्या हातात पाणी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भयानक घटना! भाच्याच्या लग्नात आनंदाने नाचत होता मामा; पण पुढच्याच क्षणी कोसळला अन्…थरारक VIDEO पाहून फुटेल घाम

लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @fewsecl8r नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले. ‘हे धोकादायक आहे.’ ‘आता ट्रकमध्येही एसी येतो, भाऊ’ अशी प्रतिक्रिया आणखी एका यूजरने दिली आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘मजबूरी आहे भाऊ, काय करू.’