Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. ट्रक चालकांच्या हुशारीचे नेहमीच वेगवेगळे किस्से ऐकायला मिळतात असंच एक नवीन प्रकरण सध्या समोर आलं आहे. यामध्ये या ट्रक चालकाने कितीही स्पीडमध्ये ट्रक चालवला तरी दंड बसू नये म्हणून एक खतरनाक जुगाड केला होता. या पठ्ठ्याची नंबर प्लेट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

दरम्यान त्याला वाटलं आपला हा जुगाड कुणाला कळणार नाही, मात्र एका पोलिसांच्या हे लक्षात आलं आणि पुढे काय घडलं तुम्हीच पाहा. तसेच पठ्ठ्याने केलेला जुगाड पाहूनही डोक्याला हात लावाल.

वाहनाची ओळखही नंबर प्लेट असते. अनेक जण फॅन्सी नंबर प्लेट बनवितात. नंबरला अक्षरच्या स्वरुपात बदलतात त्यावर वेगळीच डिझाईन केली जाते मात्र वाहनासाठी असणाऱ्या नंबर प्लेटचे नियम पाळणे कायद्याने आवश्यक आहे. सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये या ट्रक मालकानं दंड लागू नये म्हणून भलतंच डोकं लावलंय. पण त्याची ही हुशारी फार काळ लपून राहिली नाही. आता तुम्ही म्हणाल त्यानं असं केलं तरी काय? तर पठ्ठ्यानं ट्रकच्या नंबर प्लेटवरच काळं ग्रीस लावलं होतं. त्यामुळे कितीही स्पीडमध्ये ट्रक चालवला किंवा नियम मोडले तरी त्याच्या नंबर प्लेटमुळे ट्रकवर दंड बसत नव्हता. एवढंच नाहीतर त्यानं ट्रकच्या मागच्या नंबर प्लेटवरही तसंच काळं ग्रीस लावलं होतं, ज्यामुळे ऑनलाईन चलान कापलं जाणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा ट्रक डायव्हर घाबरल्यामुळे कशाप्रकारे आता खोटं बोलत आहे. मात्र पोलिसांसमोर याची हुशारी टिकली नाही. पोलीसही त्याला सांगत आहेत की, तुला दुसऱ्यांच्या जिवाची किंमत नाही ना आता आम्ही तुला चांगलंच चलान कापणार आहोत, तसेच त्याच्याकडे लायसन्सही नसल्याचं तो सांगतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं १०० किलोच्या प्राण्याला १ हजार फूट उंचावर नेलं अन्..शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.