आयुष्यात कितीही पैसा कमवा, किती ऐश्वर्य कमवा, नाव कमवा, प्रसिद्धी कमवा पण जर तुमच्याकडे खरा मित्र नसेल तर सर्वकाही व्यर्थ आहे. संकटात धावून येतो तोच खरा मित्र असे म्हणतात. हा असा मित्र असतो ज्याला तुम्हाला काय वाटते हे कधीही सांगावे लागत नाही. तुम्हाला त्याची गरज आहे हे देखील सांगावे लागत नाही, काहीही झाले तरी तुमची साथ न सोडणारा मित्र मिळणे यासारखे दुसरी भाग्याची आणि आनंदाची गोष्ट नाही. अगदी लहानपणापासून ज्यांना असा मित्र भेटतो ते लोक अत्यंत भाग्यशाली असतात. शाळेत एकत्र जाण्यापासून मोठे झाल्यानंतर फिरायला एकत्र जाण्यापर्यंत ही मैत्री अधिक दृढ होते. मैत्री म्हणजे काय असते हे शिकवणाऱ्या चिमुकल्यांचा गोंडस व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला गाणे गात आहे तर दुसरा नाचत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अवघड झाले आहे.
maelenasison नावाच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ एका शाळेतील कार्यक्रमा दरम्यानचा आहे जिथे शाळकरी मुले स्टेजवर येऊन आपले कौशल्य दर्शवत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला Pretty Little Baby हे गाणे म्हणत आहे तर दुसरा चिमुकला त्याला साथ देत आहे. दुसऱ्या मित्राला जरी गाणे गात येत नसले तरीही जमेल तसा डान्स करू मित्राला साथ देत आहे. स्टेजवर गेल्यानंतर सर्वांना भिती वाटते हीच भिती दूर करण्यासाठी हा चिमुकला आपल्या मित्राची साथ देत आहे. सर्वात मजेशीर गोष्ट अशी दोघेही स्टेजवर उभ राहून एन्ज़ॉय करताना दिसत आहे. मित्राला गाताना पाहून चिमुकल्यांना हसू आवरत नव्हतं. गाण्याची पहिली ओळ गायल्यानंतर त्यांना स्वत:ला खूप हसू येते. दोघेही एकमेकांना पाहून खळखळून हसतात. त्यानंतर पुन्हा गाणे म्हणण्यास सुरुवात करतात. दोघांचा निसारगपणा आणि गोंडस मैत्री पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले आहे.
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. चिमुकल्यांची अवस्था पाहून एकाने लिहिले की, “मैत्रीतील पहिला नियम म्हणजे जिगरी मित्राबरोबर कोणतेही महत्त्वाचे काम करू नये.”
दुसर्याने लिहिले की, हा व्हिडिओ पाहून मला आनंद वाटतो.
तिसऱ्याने लिहिले की, ते दोघेही आयुष्यभर मित्र राहतील.