Turtle Eats Live Snake Video Viral : साधारणपणे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कासव शाकाहारी प्राणी आहे; जो फक्त गवत, पानं, फळं खातो. काही कासवांना कीटक आणि कोळी खायलाही आवडतात. पण, तुम्ही कधी कासवाला सापाला खाताना पाहिले आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही; पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कासव नदीकाठी सापाला अवघ्या क्षणभरात गिळताना दिसतोय. कासवाची शिकार करण्याची ही पद्धत इतकी भयानक आहे की, ते दृश्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
कासवाची शिकार करण्याची भयानक पद्धत
व्हिडीओमध्ये दिसून येते की, एक कासव आपल्या डोळ्याची पापणी लवत नाही तोवर जिवंत सापाला अख्खा गिळतो. सापाची शिकार करण्यासाठी कासव शांतपणे नदीकाठच्या एका दगडामागे लपून बसला. यावेळी पाण्याचा प्रवाह वेगवान होता आणि साप त्यातून वाहत त्या दगडाजवळ येऊन अडकतो. यावेळी कासव संधी साधून काही सेकंदांत खडकांमधून बाहेर येत सापाला तोंडात पकडतो आणि गिळतो. त्यानंतर तो परत खडकांमागे लपून बसतो. अख्खा साप गिळल्यानंतर कासव पूर्णपणे सामान्य स्थितीत येतो. यावेळी तो असे दाखवतो की, जसे काही घडलेच नाही. कासवाची ही शिकार करण्याची थरारक आणि भयानक पद्धत पाहून युजर्सनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कासवाच्या शिकारीचा हा आश्चर्यकारक व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मला वाटत होते की, कासव शाकाहारी आहे आणि फक्त वनस्पती खातो. दुसऱ्याने लिहिले की, हा कासव खूपच फास्ट निघाला. बहुतेक कासव शाकाहारी असतात; परंतु कासवांच्या काही प्रजाती आक्रमक असतात आणि त्या मासे, बेडूक व लहान साप यांसारख्या प्राण्यांची शिकार करतात.