Viral Video: गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर असा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात जे धक्कादायक असतात. पण असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. जिथे लोक ज्वालामुखी जवळ जाण्यास घाबरतात तिथे दोन जणांनी कमाल करून दाखवली आहे.

ज्वालामुखीच्या शिखरावर केलेला स्टंट

हा व्हिडिओ वनुआटू मधील यासूर पर्वतावर शूट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, हा स्टंट ज्वालामुखीपासून केवळ १३७ फूट उंचीवर करण्यात आला आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा अप्रतिम व्हिडिओ तुम्ही देखील पाहा..

(हे ही वाचा: वनकर्मचाऱ्यांनी घडवून दिली हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची आईशी भेट; माता हत्तीने देखील दिला सोंडेने आशीर्वाद)

जागतिक रेकॉर्ड आपल्या नावावर

राफेल आणि अलेक्झांडर या जोडीने सक्रिय ज्वालामुखीवर सर्वात लांब स्लॅकलाइन वॉक पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला आहे. २६१ मीटर लांब स्लॅकलाइनवर चालताना तुमच्या भीतीवर मात करण्यासाठी खरोखर खूप धैर्य लागते. दोघांनी हेल्मेट आणि गॅस मास्क घातलेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही धगधगता ज्वालामुखी देखील पाहू शकता.

(हे ही वाचा: ‘रील’साठी सापाबरोबर पोज देणं साधुला पडलं महाग; हकनाक गमावला जीव)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ व्हायरल झाला

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या कंमेंट देखील केल्या आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ज्वालामुखीच्या वरच्या दोरीवर चालणे घातक असल्याचे वर्णन केले आहे. खरे तर या दोघांनाही कोणत्याही क्षणी जीव गमवावा लागला असता.