Uber auto driver harassed female lawyer: वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुले फिरतायत. यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी घाबरून शांत बसतात.

सध्या अशीच एक घटना दिल्ली-एनसीआरआधारित वकील तान्या शर्मा यांच्याबरोबर घडली आहे. उबर राइड बुक केल्यानंतर तान्याला नियुक्त केलेल्या ड्रायव्हरकडून अश्लील आणि त्रासदायक मेसेज येऊ लागले. जेव्हा तिने ड्रायव्हरला सांगितले की तिला पाच मिनिटे उशीर होणार आहे, तेव्हा नियुक्त ड्रायव्हर जितेंद्र कुमारने उत्तर देत मेसेजमध्ये लिहिले की, “जल्दी आओ बाबू यार, मन हो रहा है.”

पुढे जेव्हा तिने उबेरकडे याबद्दल तक्रार केली, तेव्हा कंपनीने सुरुवातीला एक सहानुभूती दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे तिला हे प्रकरण सार्वजनिकरित्या बाहेर आणावे लागले. तिच्या सोशल मीडियाची पोस्ट पाहून कंपनीने ड्रायव्हरला उबेर प्लॅटफॉर्मवरून बंदी घातली.

तान्या शर्माची व्हायरल पोस्ट

तान्याने याबाबत लिंक्डइनवर पोस्ट शेअर केली आणि लिहिलं, “आपण २१ व्या शतकात राहतो आणि तरीही लोकांसाठी दररोज गोष्टी इतक्या दयनीय आणि क्लेशकारक आहेत की एक ऑटो ड्रायव्हरदेखील तुमचा भरदिवसा छळ करतो, तुमच्याशी अश्लील वर्तन करतो. मी उबर ऑटो बुक केली आणि पाच मिनिटांतच मला त्रासदायक मेसेज येऊ लागले. मी बुकिंग रद्द केले आणि तक्रार दाखल केली, परंतु उबर इंडियाच्या तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये पीडितेला सहानुभूतीपूर्ण संदेश पाठवणे आणि नंतर ते विसरणं समाविष्ट आहे असं दिसतं. हे असंच काम करतं का?”

ही घटना ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आणि यामुळेच अनेकांनी या महिलेच्या तक्रारीवर जलद कारवाई न झाल्याबद्दल संताप व्यक्त केला. तान्याने नंतर उबरचे तक्रार अधिकारी हेमंत कुमार चेंगननगरी यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अपडेट शेअर केले. तिने कंपनीच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले, “तुमच्या पॉलिसीच्या या तथाकथित ४८ तासांच्या कालावधीत इतर महिलांच्या बाबतीत असेच घडले तर? तुम्ही माझ्या सुरक्षिततेची आणि तेथील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार आहात का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दबावामुळे उबरने आरोपी ड्रायव्हरवर घातली बंदी

वाढत्या दबावामुळे आणि टीकेमुळे अखेरीस उबरने आरोपी ड्रायव्हरला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून बंदी घातली. तान्याने एक फॉलो-अप पोस्टमध्ये तिची कृतज्ञता व्यक्त केली, “ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्यांचे अनुभव शेअर केले त्या प्रत्येकाचे आभार. या परिस्थितीत माझ्याबरोबर लोक आसल्याने मी कृतज्ञ आहे. उबरने आता या समस्येकडे लक्ष वेधले आहे आणि रायडरवर बंदी घातली आहे, याची खात्री करून की तो हे वर्तन इतर कोणाशीही करू शकत नाही. तथापि, मी सर्वांना विनंती करते की जर अशा गोष्टी कोणाबरोबर घडल्या तर लगेच अॅक्शन घ्यावी आणि या समस्यांबद्दल जागरूकता वाढवावी.”