Woman fight in Bus Video : छप्पर उडणारी बस, पाणी गळणारी बस, हाताने वायपर फिरवून समोरील काचेवरचे पाणी साफ करणाऱ्या एसटी ड्रायव्हरच्या व्हिडिओनंतर आता वेगळ्याच कारणामुळे एसटी बस चर्चेत आली आहे. बसमध्ये अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. सहसा बसमध्ये प्रवासादरम्यान गर्दी असते त्यामुळे लोकांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणांवरुन भांडण होतं. अशा अनेक घटना समोर येत असतात. दोन मिनिटांपूर्वी गप्पा मारत बसलेल्या महिला कधी एकमेकींच्या झिंज्या उपटतील याचा काही नेम नाही. अशातच अशीच एक घटना दिल्लीच्या एका बसमध्ये घडली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही खरंच डोक्याला हात लावाल.
या व्हिडीओमध्ये एका सार्वजनिक बसमध्ये बसण्यावरून वाद सुरु आहेत. व्हिडीओ बघा, या व्हिडिओमध्ये दिसेल बसमध्ये एकाच सीटवरून हे वाद सुरु आहेत. एका सीटवर दोन बायका बसलेल्या आहेत. त्यातली एक महिला दुसऱ्या महिलेच्या मांडीवर बसलेली आहे. त्या दोन्ही महिला इतक्या जोरजोरात भांडतायत की बास. भांडताना त्या एकमेकांचे केस ओढतायत. एकमेकींच्या अंगावर धावून जातायत. तिथे बस मध्ये असणारा एक व्यक्ती त्या दोन महिलांची भांडणे थांबवायचा प्रयत्न करतो. तरीही काहीच फरक पडत नाही. त्या कोणाचही न एकता जोरजोरात भांडतच राहतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: पबमध्ये तरुणी गुपचूप करतेय पुरुषांच्या शर्टवर किस, बायकांनी पाहिल्यावर होणार हायव्होल्टेज ड्रामा
महिलांच्या भांडणाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ फक्त बघितलेच जात नाहीत तर ते तितकेच शेअर देखील केले जातात. या भांडणाचं पुढे काय झालं, कशासाठी ही भांडणं झाली याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंटच्या माध्यमातून त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.