Ukhana funny video: उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा लग्न समारंभात लयबद्ध पद्धतीने आवडीने जोडीदाराचे नाव घेतले जाते यालाच आपण उखाणा म्हणतो. पूर्वी महिला त्यांच्या पतीसाठी उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतात.सोशल मीडियावर पुरुष किंवा महिलांचे उखाणे घेतानाचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा महिला विनोदी उखाणा घेताना दिसत आहेत. दरम्यान आता होम मिनिस्टर कार्यक्रमात एका विहिनींनीही जबरदस्त असा उखाणा घेतला आहे. अशा प्रकारचा हटके उखाणा तुम्ही आजपर्यंत कधीही ऐकला नसेल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून वहिणींचा उखाणा ऐकून तु्म्हीही पोट धरुन हसाल.

अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने उखाणे घेतात. कधी कोणी उखाण्यातून त्यांची लव्ह स्टोरी सांगतात तर कधी कोणी एखाद्या गोष्टीचे महत्त्व सांगतात. उखाण्यातून अनेकदा महिला त्यांच्या भावना व्यक्त करतात. या वहिणींनीही त्यांच्या नवऱ्यासाठी जबरदस्त असा उखाणा घेतला आहे. हा उखाणा उपस्थित महिलांनाही हसू अनावर झालं आहे. तुम्हीही वहिनींच उखाणा ऐकून पोट धरुन हसाल तसेच त्यांच्या बिनधास्तपणाचं कौतुकही कराल.

“घरी बनवला पिझ्झा…”

आता तुम्ही म्हणाल असा काय घेतलाय उखाणा? तर या वहिणींनी “घरी बनवला पिझ्झा त्यात चिज घातलं किसून प्रसाद बसले रुसून मीच खाल्ला चाटून पुसून” असा उखाणा घेतला आहे. बरं हा उखाणा घेताना या वहिनींनाही हसू आवरत नाहीये. मिश्किल विनोदी असा उखाणा या वहिणींनी घेऊन सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आणलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> खतरनाक! पुणेरी पाटी सोडा “ही” कोकणी पाटी पाहा; कचरा टाकणाऱ्यांना दिली अशी धमकी की PHOTO पाहून पोट धरुन हसाल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ zee5_marathi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय बाई काय हे तर आणखी एकानं वहिनी काही ऐकत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी व्हिडीओवर हसण्याचे इमोजी टाकले आहेत.