Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रेरणादायी विचार व्हायरल होत असतात. कधी सुंदर सुविचार सांगणारे व्हिडीओ तर कधी फोटो व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा जुना व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी एक सुंदर सुविचार सांगितला आहे. व्हिडीओतील त्यांचे घराविषयीचे सुंदर विचार ऐकून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नितीन गडकरी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात. ते एक कार्यक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून राजकारणात ओळखले जातात. कधी त्यांचे काम तर कधी त्यांची भाषणे चर्चेचा विषय ठरतात. सध्या त्यांच्या एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी घराविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये नितीन गडकरी घराविषयी बोलताना म्हणतात, “घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती… तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती.. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी.. अश्रुतूनही प्रित झिरपावे, नकोच नुसते पाणी..” त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक जण गडकरी यांना त्यांचा आदर्श मानतात. गडकरी हे स्वच्छ आणि निर्मळ राजकारणी माणूस म्हणून ओळखले जातात.

हेही वाचा :बापरे! भरधाव कारने सायकस्वार अन् दुचाकीचालकाला उडवले, थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

marathi_speaker या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घर असावे घरासारखे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप खूप प्रेम रोडकरी” तर एका युजरने लिहिलेय, “गडकरी साहेब खूप छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्वा.. व्वा… व्वा.. क्या बात है अगदी खरं आहे गडकरी साहेब.. तुमच्याविषयी अभिमान वाटतो स्वच्छ सुधारक राजकारणी आहात तुम्ही” अनेकांना गडकरींचे घराविषयीचे विचार आवडले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “नीतिमत्ता जपून राहिलेला स्वच्छ समाजकारणी व्यक्तिमत्त्व”