Raksha Bandhan 2023: बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. काही तासांवर हा सण आला असून बाजारपेठा सजल्या आहेत. भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भाऊ आणि बहिणी हा सण साजरा करतात आणि एकमेकांच्या रक्षणाची शपथ घेतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर भावा-बहिणीच्या प्रेमावर अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशातील असाच एक वेगळा आणि कौतुकास्पद व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेड्या बहिणीची वेडी माया!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला महिला पोलीस कर्मचारी एका अपंग व्यक्तीला राखी बांधताना दिसतील. ही दिव्यांग व्यक्ती रस्त्याच्या कडेला व्हीलचेअरवर बसली असून महिला पोलीस त्याच्या हाताला राखी बांधत आहेत. राखी बांधताना दिव्यांग व्यक्ती खूप आनंदी आणि उत्साही दिसत असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या चेहऱ्यावरही हसू पाहायला मिळत आहे. राखी बांधल्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांनीही दिव्यांगजनांना मिठाई खाऊ घातली.

गेल्यावर्षीचा हा व्हिडीओ असून रक्षाबंधनच्या निमित्ताने तो पुन्हा व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी तिनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका अपंग तरुणाला राखी बांधली होती. पण हा तरुण त्यानंतर पुन्हा कधीच दिसला नाही. यावर्षी सुद्धा ती आपल्या या भावाला राखी बांधण्यासाठी त्याची वाट पाहात आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्याला शोधण्यासाठी तिनं तो जुना व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. किमान हा व्हिडीओ पाहून कोणीतरी तिला त्याचा पत्ता कळवेल, अशी आशा तिला आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: वाघाच्या ‘आरे’ला सिंहाने केले ‘कारे’, पाहा भांडणात कोणी मारली बाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.