‘पैसा.. पैसा… करती है पैसे पे क्यों मरती है…’ हे गाणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल यात शंका नाही. शिवाय जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही असे अनेक व्हिडीओ आणि मीम्स पाहिले असतील, ज्यामध्ये मुलींना पैसेवाला मुलगा कसा आवडतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण सगळ्याच मुली सारख्या नसतात आणि सगळ्याच केवळ पैशाला महत्व देत नाहीत याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. या संबंधित एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुण त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता यावेळी प्रेयसीने तिच्या प्रियकराच्या पाकिटात कमी पैसे आहेत, म्हणून त्याला न सांगता गुपचूप पैसे दिल्याचा दावा तरुणाने केला आहे.

५०० रुपयांच्या नोटांचा फोटो पोस्ट करत उत्कर्ष नील नावाच्या तरुणाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी मागील पाच वर्षांपासून लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये आहे. आम्ही माझ्या UPSC (पब्लिक युनियन सर्व्हिस कमिशन) तयारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भेटलो होतो. आम्ही एकत्र कोचिंग केले, जिथे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आज ती MNC (Multinational Company) मध्ये काम करते आणि मी अजूनही परीक्षेची तयारी करत आहे, या वर्षी मी तिला भेटायला गेलो तेव्हा तिने पाहिले की माझ्या पाकिटात कमी पैसे होते म्हणून तिने मला न सांगता गुपचूप माझ्या पाकिटात पैसे ठेवले. त्यानंतर जेव्हा तिने मला रेल्वे स्टेशनवर सोडले तेव्हा मी पाकिटातील पैसे बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं.” त्याने पुढे लिहिलं की, सध्याच्या काळात, अशी व्यक्ती शोधा जी तुम्हाला अशा प्रकारे साथ देईल.

हेही पाहा- किळसवाणा प्रकार! जेवण द्यायला आलेला डिलिव्हरी बॉय जेवणावरच थूंकला, संतापजनक VIDEO होतोय व्हायरल

UPSC विद्यार्थ्याने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठी प्रमामात व्हायरल झाली आहे. तर या पोस्टला आतापर्यंत २० लाखाहून अधिक व्ह्यूज आणि २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो वापरकर्त्यांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, तुमची प्रेयसी अप्रतिम आहे. तर काही नेटकरी म्हणत आहेत, “देव प्रत्येकाला अशी गर्लफ्रेंड देवो.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलं, “भावा पैशाऐवजी तुजा फोटो टाकला असता तर बरं झालं असतं.”