whale fish video: समुद्रातील जैवविविता आपल्या सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. विशाल समुद्रात मुंगीच्या आकाराएवढे जीव, तसेच थेट ५० टनांपर्यंतचे देवमासेसुद्धा असतात हे आपल्याला माहीत आहे. देवमासा हा समुद्रातील सर्वांत मोठा मासा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याला पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. मात्र, विचार करा हा मासा तुमच्या गळाला लागला तर? ऐकूनच भीती वाटली ना… मात्र असा प्रकार प्रत्यक्षात काही लोकांसोबत घडलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साहजिकपणे हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत.

गळाला लागला देव मासा अन् मग…

काही हौशी लोक सुटीच्या दिवशी टाइमपास म्हणून मासेमारी करायला जातात. अशातच आता एका व्यक्तीने केलेल्या मासेमारीचा व्हिडीओ समोर आला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अमेरिकेमधील एका माणसाबरोबर हा भीतीदायक प्रकार घडलाय. बोटीत बसून मासे पकडत असताना अचानक त्या माणसाच्या गळाला चक्क देवमासा लागला. हा व्हिडीओ पाहूनच थरकाप उडतो. विचार करा त्या बोटीतील लोकांचे काय झाले असेल…

थरारक व्हिडीओ होताय व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती समुद्राच्या पाण्यात गळ टाकून, गळाला मासा लागण्याची वाट पाहत आहे. मात्र, त्याने कधीही विचार केला नसेल की, गळाला चक्क विशाल अस देवमासा लागेल. तो मासा लागण्याची वाट पाहत असतानाच समुद्रात लांबपर्यंत पाण्यात मोठी हालचाल दिसू लागते आणि काही कळायच्या आतच समुद्रातून महाकाय देवमासा वर उडी मारतो आणि त्यांच्या बोटीला धडकतो. हे पाहून सगळेच घाबरतात. सुदैवाने देवमाशाने त्यांची बोट उलटवली नाही, नाही तर सगळेच जीवानिशी गेले असते. तुम्ही व्हिडीओमध्ये नीट पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की, माशाची थोडीशीच धडक बोटीला लागली; मात्र हेच जर त्या देवमाशाने बोटीवर हल्ला केला असता, तर केवढी मोठी दुर्घटना घडली असती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO : मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाची झलक पाहिलीत का? असा आहे मुंबई मेट्रोचा भुयारी मार्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचा थरकाप उडालाय. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, त्या लोकांवरही टीका करीत आहेत. हा व्हिडीओ zachpiller18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज, लाइक्स मिळाले आहेत.