टोलनाक्यावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टोल कर्मचाऱ्यांबरोबर वाद होतात. यावेळी टोल कर्मचारी कारचालकाबरोबर गैरवर्तन करतात, अशावेळी वाद होतात आणि वादाचे रुपांतर शेवटी हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचते. काहीवेळा तर असे काही घडते की तुम्ही विचारही करू शकणार नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे, ज्यात टोल कर्मचाऱ्याला एका कारचालकाने अवघ्या १६५ रुपयांसाठी चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेचा अतिशय भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. एक भरधाव कार टोल कर्मचाऱ्याला थेट उडवून निघून गेली.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूरमधील असून पोलिसही याप्रकरणी कारवाई करत आहेत. हापूरमधील छिजारसी टोल प्लाझावर राकर येथे ही घटना घडली, ज्यामध्ये टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.

टोल कर्मचारी रस्ता ओलांडत असताना भरधाव कार आली अन्…

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दिल्ली-लखनौ हायवेच्या छिजारसी टोल प्लाझाजवळ एक भरधाव कार येताना दिसतेय. टोलनाक्यावर ही भरधाव कार येऊन थांबेल असे टोल कर्मचाऱ्याला वाटले, त्यामुळे कार येताना पाहूनही टोल कर्मचारी रस्ता ओलांडू लागला; पण कार काही थांबली नाही. उलट टोल न भरताच सुसाट वेगाने कर्मचाऱ्याला चिरडून पुढे निघून गेली. यात कर्मचारी हवेत उडाला असून टोल नाक्यापासून काही फूट अंतरावर जाऊन पडला.

पाऊस आला ढिंच्यांग ढिंच्याक! भररस्त्यात आनंदाने उड्या मारत नाचू लागला उंदीर; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

या घटनेत टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. टोल कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या टोल प्लाझावर कारचा टोल फक्त १६५ रुपये आहे.

कावळ्याचा कारनामा! चक्क शेतकऱ्याचे अर्धे शेत टाकले उपटून; VIDEO वर युजर्स म्हणाले…

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून आता पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ऑनलाइन तपासणी केली असता असे आढळून आले की, या टोल प्लाझावर गाडीला फक्त १६५ रुपये टोल भरावा लागतो, मात्र टोल टाळण्यासाठी टोल कर्मचाऱ्याला उडवल्याचा आरोप त्या व्यक्तीवर आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.