सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरनी त्यांचं एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. आजच्या काळात अनेक इन्फ्ल्युएन्सर्स आपल्या टॅलेंटच्या जोरावर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवीत आहेत. अशा काही प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सर्सना भारतात सेलिब्रिटींपेक्षा कमी डिमांड नाही. जगभरात एक रील व्हायरल होत नाही, तोवर अल्पावधीत लाखो रील बनत असतात. त्यामुळे तरुणाईदेखील या कामाचा आनंद घेऊ लागली आहे. यातून केवळ नावच नाही, तर पैसा आणि प्रसिद्धी, असे सर्व काही मिळते. त्यात प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार सर्व काही करता येते. दरम्यान तुम्ही कधी हे इन्फ्लुएन्सर दिवसा व्हिडीओ आणि रात्री चोरी करतात असं ऐकलंय का? नाही ना…मात्र उत्तर प्रदेशातून चक्रावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन फेमस इन्फ्लुएन्सर दिवसा रिल तर रात्री चोरी करायचे.. काय आहे नेमकं प्रकरण चला जाणून घेऊ.

दिवसा रिल तर रात्री चोरी

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लोखंडी सळ्या चोरी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा समावेश आहे. सोशल मीडियावर त्यांचे लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. त्यांच्या रीलला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र आता ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. ४५ क्विंटल लोखंडी सळ्या चोरीच्या प्रकरणात इन्फ्लुएन्सरचा हात असल्याचा आरोप आहे. सध्या तपास सुरू आहे.

खरं तर, बहराइच जिल्ह्यात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन प्रकल्पा’अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी पाण्याच्या टाक्या मोठ्या प्रमाणावर बांधल्या जात आहेत. या कामासाठी GVR कंपनीने रिसिया पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात रॉड आणि पाईप ठेवले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीचे व्यवस्थापक नवीन रेड्डी यांच्याकडे गोदामातून चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्यावर त्यांनी गोदामाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी बबलू आणि कमलेश यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तहरीरच्या आधारे छापा टाकला आणि दुकानदार फिरोजसह परिसरात इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले साहिल उर्फ ​​सुफियान आणि फरहान या दोन इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर्संना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून ४५ क्विंटल रेबारने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉलीही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सुफियान आणि फरहान हे इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहेत. तो कॉमेडी रील्स बनवतो, ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र आता दोघांनाही चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा >> VIDEO: सूनेनं सासऱ्याचा केला भयंकर शेवट, दरवाजा लावून मारहाण अन्…; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

गोदामात लावलेल्या सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिसिया पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रदीप सिंह यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून बैदर्यन पूर्वा येथील जीव्हीआर इन्फ्राटेक कंपनीच्या गोदामातून लोखंडी सळ्या चोरून गोदामाच्या शेजारी असलेल्या आरोपी फिरोजच्या दुकानात विकले जात होते. या दुकानाचा मालक फिरोज, त्याचे अन्य दोन सहकारी, इन्स्टाग्रामवर इन्फ्ल्युएन्सर असणारे साहिल आणि सुफियान हे चोरलेले बार खरेदी करायचे. अखेर गोदामातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींना पकडण्यात आलं.