Street Fight Between Vegetable Vendor and Car Driver: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट याशिवाय अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तुम्ही भांडणांचेदेखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कधी महिलांची तर कधी तरुणींची भांडणे सतत पाहायला मिळतात. कुठे बसमध्ये तर कुठे ट्रेनमध्ये भांडणे सुरू असतात. तसेच अनेकदा भररस्त्यात, बाजारात भांडणे होत असतात आणि ही भांडणे कधी हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचतील सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

भांडणे ही वाईट गोष्ट आहे, पण जर भांडण सुरुवात करणाऱ्याला मारहाण झाली तर लोकांना खूप मजा येते. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये असेच काहीसे दिसून येते, ज्यामध्ये एक कारमालक भाजी विक्रेत्यावर हल्ला करण्यासाठी मोठ्या रुबाबाने येतो, पण त्याची ही चाल इतकी उलटी ठरते की तो भाजीवालासुद्धा पैलवान निघाला. त्यानं एका क्षणात डाव उलटा केला. काय घडलं ते जाणून घेऊया…

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून वापरकर्ते त्या कारमालकाची खिल्ली उडवत आहेत. व्हायरल व्हिडीओनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील संभल येथील चंदौसी कोतवाली परिसरासमोर घडली असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत आता काही लोक या व्हिडीओमध्ये पोलिसांनाही शोधत आहेत. पण, कमेंट सेक्शनमधील बहुतेक वापरकर्ते फक्त कारमालकाची खिल्ली उडवताना दिसतात.

हातगाडी कारला धडकली…

घडलं असं की, रस्त्यावर असलेली भाजीवाल्याची हातगाडी त्या व्यक्तीच्या कारला धडकली. त्यामुळे कारमालकाला भाजीवाल्याचा राग आला व तो थेट गाडीतून उतरून भाजीवाल्याच्या अंगावर धावून आला व भाजीवाल्याला मारायला सुरुवात केली. पण, भाजीवालासुद्धा कमी नाही. त्यानेही चोख उत्तर दिलं. कारमधून आलेल्या व्यक्तीनं त्याला मारायला सुरुवात करताच भाजीवाल्यानंसुद्धा त्याच्यावर उलट वार केला. अशा परिस्थितीत कारमालकालाच भाजीवाल्याकडून चांगलेच फटके मिळू लागले.

क्लिपमध्ये दिसणारा कारमालक शारीरिकदृष्ट्याही भाजीवाल्यापेक्षा बलवान दिसतो. पण, तरीही भाजीवाला त्याला चोख प्रत्यत्तर देतो. दोघांमध्ये सुमारे ३२ सेकंद जोरदार वाद होतो आणि शेवटी काहीही न गमावता किंवा न मिळवता, भाजी विक्रेता त्याच्या गाडीसह तिथून निघून जातो; तर कारमालक त्याच जागी उभा असल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

X वर हा व्हिडीओ पोस्ट करताना @gharkekalesh ने लिहिले, “उत्तर प्रदेशातील संभल येथे एका भाजी विक्रेत्या आणि कारमालकामध्ये गाडीला धडक दिल्यावरून वाद. आतापर्यंत या व्हिडीओला २६ हजारांहून अधिक व्ह्युज आणि ४०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टवर ५० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.