Vicky kaushal tauba tauba song Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातलं ‘तौबा तौबा’ गाणं सध्या चांगलंच गाजतंय. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतंय. अनेकांनी यावर रील व्हिडीओ करीत चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. याच ‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्ध महिलांनी केलेला रील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या व्हिडीओवर विकी कौशलने जी कमेंट केली आहे, त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजीबाईंची गृप ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. आजीने साडी नेसून अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.आजीचा हा डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आजीबाईंच्या या गाण्यावरील डान्स पाहून विकी कौशल देखील भारवला आहे.
विकी कौशलने दिली प्रतिक्रिया
या व्हिडिओमधील डान्स करणाऱ्या आजीबाई कर्नाटकमधील एका वृद्धाश्रमातील आहेत. या डान्सच्या व्हिडिओवर विकी कौशलची नजर पडली आणि तो व्हिडिओ पाहून विकीला प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवलेच नाही. त्यानंतर विकी कौशलने या व्हिडिओला प्रतिक्रिया देत भावुक इमोजी शेअर केल्या आहेत. विकी कौशलच्या प्रतिक्रियेनंतर या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच
विकी कौशलच्या या फॅनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओला ९७ हजार लोकांनी लाईक केलं आहे. ‘तौबा तौबा’ गाणं हे विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या ‘बॅड न्यूज’ सिनेमातलं गाणं असून हे गाणं आणि सिनेमा लोकांना आवडल्याचं दिसतंय.