लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला नाचायला आवडते. सोशल मीडियावर असे एकापेक्षा एक व्हिडिओ रोज पाहायला मिळतात ज्या लोक बिनधास्तपणे नाचत असतात. काही मोजकेच व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांचे मन जिंकतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना कधी कधी लोकांना प्रचंड आवडतात. सध्या असाच एका नृत्य व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुणीं स्टेजवर नृत्य करत आहे. या तरुणींपैकी एका तरुणींच्या नृत्य कौशल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणींने ‘कोंबडी पळाली’ या मराठी कलाविश्वातील सदाबहार गाण्यावर ठेका धरला आहे. तरुणीचे हावभाव मोहक आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

भरत जाधव आणि क्रांती रेडकर या मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या कलाकारांनी कोंबडी पळाली’ या मूळ गाण्यात जबरदस्त नृत्य केला आहे. तरुणीने अफलातून नृत्य करून थेट क्रांती रेडकरला टक्कार दिली आहे.

हेही वाचा – चंद्रा गाण्यावर जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारीने केली लावणी, थेट अमृता खानविलकरला दिली टक्कर, Video Viral

व्हिडीओमध्ये lavni_maharashtrachइंस्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ २ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

व्हिडीओवर कमेंट करत एकाने कमेंट केली की, “नादच नाही ताईचा, याला म्हणतात साधेपणाचे सौंदर्य!”

दुसऱ्याने कमेंट केली की, “संस्कृती जपून पण कला सादर करता येते याचे उत्तम उदाहरण”

तिसऱ्याने कमेंट केली की, “काय भारी नाचतेस गं बाई तू!”

चौथ्याने कमेंट केले की,”अहो मराठी संस्कृतीची शान आहे. इंग्रजी गाण्यावर नाचून कोणी मोठे होत नसते”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचव्याने कमेंट केली आहे,”नाद करायचा नाही, साधेपणाचे सौंदर्य!