Dombivli Station Fight Viral Video: मुंबई लोकलमधील भांडणं आपल्यापैकी अनेकांनी स्वतः अनुभवली असतील. विशेषतः महिलांच्या डब्ब्यात तर अगदी एकमेकींच्या झिंज्या उपटण्यापर्यंत वाद होतात. अलीकडेच सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांपैकी एक अशा डोंबिवली रेल्वे स्थानकावर दोन बायकांची फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. पूल उतरताना सुरु झालेला वाद प्लॅटफॉर्मवर पोहोचला आणि अगदी पोलिसांनी मध्यस्थी करूनही या बायका शांत होत नव्हत्या. या भांडणाचा व्हिडीओ सध्या ऑनलाईन तुफान व्हायरल होत आहे, नेमका हा वाद काय होता हे जाणून घेऊयात ..

प्रथमदर्शनी, डोंबिवली रेल्वे स्थानकावरील पूलवर चढत असताना एका प्रवाशाचा दुस-या प्रवाशाला पाय लागला. त्यामुळे वाद सुरु झाला. दोन्ही प्रवाशांममधील वाद विकापाेला जाऊन हाणामारी सुरु झाली असे सांगण्यात येत होते. पण व्हायरल व्हिडीओनुसार मूळ भांडण दोन महिलांचे होते. यातील एकीने- दुसरीवर आपल्या नवऱ्यासह पळून गेल्याचा आरोप केला होता.

डोंबिवली स्टेशनवर तुफान हाणामारी

हे ही वाचा<< गरोदर महिलेने ९ महिने जोरदार व्यायाम केला, ‘असं’ बाळ जन्माला आलं की.. Video पाहून म्हणाल, अशक्यच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याच वेळी डोंबिवली स्थानकात आणखी एक वाद झाला होता ज्यात सागर भिसे नामक तरुणाला दोन प्रवाशांनी मारहाण केली होती. सागर भिसे हा काल घाटकोपरहून डोंबिवलीत आला. डोंबिवलीत रेल्वे ब्रीजच्या पायऱ्या चढत असताना त्याचा एका इसमाला पाय लागला. यानंतर सागरने त्यांची माफी मागितली आणि प्रकरण वाढले नाही पण त्यानंतर उगाच काही प्रवाशांनी मध्यस्थी करून सागरना मारहाण केल्याचे समजत आहे. या प्रकरणाचा लाेहमार्ग पाेलिस ठाण्यातील कर्मचारी तपास करीत आहेत.