रायगड़ जिल्ह्यातील तळा शहरात सध्या एकच चर्चा आहे, आणि ती म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या इलेक्ट्रिक जीपची. तळा येथील विराज टिळक या तरुणाने बेरोजगारीवर मात करीत ज़िद्द, आत्मविश्वास, कठोर परिश्रमाच्या जोरावर टाकाऊ वस्तू पासून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. ही पूर्णपणे तळा येथे डिझाईन करण्यात आली असून तिच्या चासी पासून कलर, आणि तिची सजावट, पेंटिंग देखील एकच ठिकाणी करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही जीप बनवण्यासाठी वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, कटर आणि रिबेट मशीन वापरण्यात आलंय. अवघी चार अवजारे वापरून ही जीप बनवण्यात आली आहे.

याबद्दल विराज टिळक सांगतो की, “या जीप मध्ये चार बॅटरीज आहेत आणि एक इलेक्ट्रिक मोटर आहे. हिला बनवण्या साठी साधारण दीड लाख रुपये खर्च आलाय. एकदा चार्ज केली कि ही जीप ७५ ते ८० किमी चालते. मोठ्या बॅटरीज असतील तर १०० किमी पेक्षा अधिक ही जीप चालू शकते. साधारण पणे चार ते पाच तास बॅटरी चार्जिंगसाठी वेळ लागतो. ३० ते ३५ रुपयात ८० किमी प्रवास या मध्ये आश्रमात करता येईल. विरोध कमी व्हावा आणि जुन्या जीपला शोभतील म्हणून मोटारसायकचे टायर या जीपला वापरले आहेत.”

(हे ही वाचा: मुलीने हार घालण्यास नकार दिल्याने वराला आला राग आणि… ; बघा Viral Video)

ह्या जीपचा स्पीड ३० वर लॉक केला आहे. मागे पुढे पाटे लावून सस्पेन्शन देखील उत्तम केले आहे. तसेच हँडब्रेक, उताराला अँटीलॉक सिस्टम देखील आहे. हेडलाईट, पार्किंग लाईट, इंडिकेटर, हॉर्न देखील आहे खराबी झाली तर फ्युज प्रोटेक्शन आहे. ह्या जीप किंवा इलेक्ट्रिक गाडी मुळे प्रदूषण होत नाही.

(हे ही वाचा: Viral: व्यक्ती गाढ झोपेत असताना अंगावर चढले दोन मोठे अजगर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क)

(हे ही वाचा: “आकस्मिक निधनाची बातमी समजल्यानंतर…”; ‘के के’च्या निधनानंतर राहुल गांधींची पोस्ट)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगारासाठी अश्या प्रकारचे उपक्रम शासनाने हाती घेतले तर रोजगार निर्मिती होऊ शकते रिवर्स मायग्रेशन होऊ शकते. तरुणांच्या हाताला काम मिळू शकते.