Viral Video: हॉटेलमधील कर्मचारी, विमानात आपल्या सेवेसाठी असणाऱ्या हवाईसुंदरी ही सुद्धा माणसं आहेत याचा बहुतांश वेळा अनेक मोठ्या हस्तींना विसर पडतो. जरी ही मंडळी आपल्या सेवेसाठी असली तरी ते आपले नोकर नाहीत आणि जरी नोकर असले तरी त्यांच्यावर आरडाओरडा करण्याचा आपल्याला हक्क नाही. याच श्रीमंतीच्या अहंकाराला विमानातील हवाईसुंदरीने चांगलाच धडा शिकवल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . इंडिगोच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाच्या उद्दामपणाने वैतागलेल्या हवाईसुंदरीने कठोर शब्दात त्याला समज दिली. हे भांडण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार, विमानात दिल्या जाणाऱ्या जेवणावरून प्रवासी आणि हवाई सुंदरी यांच्यात वाद झाला.गुरप्रीत सिंग हंस नावाच्या ट्विटर युजरने या भांडणाची क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, जेव्हा केबिन क्रू सदस्यांपैकी एक हवाई सुंदरी प्रवाशांना जेवण देत होती, .

pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप
tiger unexpectedly came out of bushes jumped on cow
जंगल सफारीचा आनंद घेत होते पर्यटक, अचानक झुडपातून बाहेर आला वाघ, उडी मारून….पुढे काय घडले ते व्हिडीओमध्ये बघा

यावेळी एका प्रवाशाने उद्धटपणे ओरडायला सुरुवात केली ज्यावर तिने सुरुवातीला तुम्ही नम्रपणे बोला असं सांगितलं. तरीही न ऐकल्याने शेवटी त्या हवाई सुंदरीनेही आपला आवाज चढवला. यावर प्रवाशाने उलट तिलाच तू ओडरतेयस का? असा प्रश्न केला ज्यावर तिने त्याला आठवण करून दिली की आधी तू आमच्यावर ओरडायला सुरुवात केलीस आणि स्वतःच्या शब्दांवर व आवाजावर लक्ष दे. आम्ही तुमचं शांतपणे ऐकतो पण तुम्हीही आमचा आदर करायला हवा,

इतकं भांडण होऊनही त्या प्रवाशाने तिला अजून डिवचत तुम्ही आमचे नोकर आहात असे सांगितले ज्यावर तिने मी एक कर्मचारी आहे आणि तुम्ही माझ्याशी अशा आवाजात बोलू शकत नाही असा पलटवार केला.

हवाईसुंदरीचा रुद्रावतार

हे ही वाचा << मुलीच्या जन्माने हादरलं कुटुंब; पायगुण नव्हे तर ‘हे’ पाय बघूनच डॉक्टर झाले थक्क, पाहा Viral फोटो

इंडिगोने या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून एक निवेदन जारी केले आहे. “१६ डिसेंबर २०२२ रोजी इस्तंबूल ते दिल्ली या फ्लाइट 6E १२ मध्ये घडलेल्या घटनेची आम्हाला माहिती आहे. ही समस्या कोडशेअर कनेक्शनद्वारे प्रवास करणाऱ्या ठराविक प्रवाशांनी निवडलेल्या जेवणाशी संबंधित होती. इंडिगो आपल्या ग्राहकांच्या गरजा जाणून आहे आणि आमच्या ग्राहकांना विनम्र आणि त्रासमुक्त अनुभव देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, आम्ही पुढेही हा प्रयत्न सुरु ठेवू.”