Viral Video: दिल्लीतील डीटीसी बसमध्ये एका व्यक्तीने एका महिलेसमोर आपले प्रायव्हेट पार्ट दाखवून गैर हरकत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र यानंतर त्या बसमधील अधिकाऱ्याने व्हिडीओ काढताच ही व्यक्ती समोर रडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अधिकाऱ्याने विचारणा केल्यावर संबंधित व्यक्तीने स्वतःची माहिती दिली होती, यानुसार हा इसम बिहारचा मूळ रहिवासी असून त्याचे नाव झाकीर असल्याचे समजत आहे. दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (डीटीसी) मार्शलने या इसमाला प्रायव्हेट पार्ट हातात धरून महिलेचा विनयभंग करताना पकडले होते.

आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मार्शलने पोलिसांना घटनेची माहिती दिली असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. दुसरीकडे झाकीर हा या व्हिडिओमध्ये रडताना पाहून त्याला मुद्दाम यात अडकवलं जात आहे का असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. पण झाकीर आपल्यावरील आरोप फेटाळताना दिसत नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे झाकीर दिल्लीमध्ये शूजचा व्यवसाय करतो.

बसमध्ये महिलेचा विनयभंग केला आणि स्वतःच रडू लागला

हे ही वाचा<< Video: आधी पाय धरला, जंगलात ओढत नेलं अन्.. भडकलेल्या गोरिलासमोर माणूस झाला हतबल, पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशाप्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडलेली नाही. मागील वर्षी अशाच एका व्यक्तीने इंदूरमध्ये मशिदीच्या आत महिलेला आपले प्रायव्हेट पार्ट दाखवले होते. तर मुंबईच्या लोकलमध्ये ही असा प्रकार अनेकदा घडला आहे. म्हणूनच सार्वजनिक स्थळी महिलांच्या सुरक्षेकडे आणखी लक्ष देण्याची गरज आहे.