Mumbai bandra Viral video: गेल्या काही दिवसांपासून रोमँटिक जोडपी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने बाइक किंवा स्कूटी चालवतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. देशातील अनेक भागातून असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. नुकताच असाच एक व्हिडिओ मुंबईतून समोर आला आहे. ज्यामध्ये एक जोडपं स्कूटीवर विचित्र पद्धतीने बसलेलं दिसत आहे. हे अशाप्रकारे कृत्य समाजात आक्षेपार्ह आहे. शिवाय रस्त्यावर अशा गोष्टी करणे म्हणजे वाहतुक नियमाचं उल्लंघनदेखील आहे. भर दिवसा रस्त्यावर धावत्या स्कूटीवर रोमान्स करताना एक जोडप कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
वाहतूक नियमाचं उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी अशा बाइकस्वारांवर कारवाईही केली. मात्र पोलिसांचा धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे. मुंबईतील बँड्रा येथील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपं चालत्या स्कूटीवर रोमान्स करत असल्याचं दिसून येतं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर खुलेआम फिल्मी स्टाईलमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत.तरुणी त्याला समोरुन मिठीत घेत टाकीवर बसलीये. तसेच तिने स्वत:च्या आणि प्रियकराच्या अंगावर ब्लँकेट घेतलं आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. दुचाकीवर बसल्यानंतर तर आणखी जास्त थंडी वाजते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रेमी युगुलाने असा जुगाड शोधलाय.ट्रॅफिकच्या नियमानुसार हेल्मेट घालून स्कूटीवर बसायला हवं, मात्र मुलगी तरुणाच्या मांडीवर बसून त्याला मिठी मारून बसलेली दिसते.यानंतर दोघंही अतिशय विचित्र पद्धतीने गाडीवर बसलेले दिसतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: लेकरांच्या दिशेने आला मृत्यू; सुपरहिरोसारखा अवघ्या एका सेकंदात बाबाने वाचवला जीव
अशा प्रकारे रस्त्यावर वाहन चालवणं अतिशय धोकादायक आहे. थोडासा तोल गेला तरी अपघात होऊ शकतो. त्यामुळे कोणालाही गंभीर दुखापत होऊ शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा प्रकारे रस्त्यावर हे कृत्य करणं जोडप्यासाठी फक्त धोकादायकच नाही तर वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. यासोबतच सामाजिकदृष्ट्या ही घटना अत्यंत अशोभनीय आहे. जोडप्याला रस्त्यात असं कृत्य करताना पाहून मुलांवरही परिणाम होईल, असं अनेकजण म्हणाले