Fusion food gone wrong : सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आजपर्यंत किमान एकदा तरी अशा काही पदार्थांचे व्हिडीओ पहिले असतील जे पाहून, ‘तो व्हिडीओ किंवा तो पदार्थ का बनवला गेला असेल?’ असा प्रश्न पडला असेल. उदाहरणार्थ चॉकलेट भात, पिझ्झा ढोकळा किंवा पार्लेजी ऑम्लेट हे आणि यांसारख्या अनेक अशा फ्यूजन पदार्थांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातलेला आहे. मात्र, सध्या या सांगितलेल्या पदार्थांपेक्षाही अत्यंत भयंकर अशा ‘ताक-पास्ता’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर suratstreetfood नावाच्या अकाउंटने शेअर केलेला ‘ताक-पास्ता’ नेमका कसा बनवला गेला आहे ते पाहूया.
तर, व्हिडीओच्या सुरुवातीला हा पदार्थ मिळतो त्या ठिकाणचा बोर्ड दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये ‘स्पे. मसाला छास पास्ता’ असे लिहिलेले दिसते. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमधून हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचे समजते. पुढे एक व्यक्ती कढईमध्ये कच्चा पास्ता आणि एक ग्लास पाणी घालतो. त्यातच ताकाची एक पिशवी रिकामी करतो. त्यानंतर यामध्ये कुठलातरी मसाला आणि चमचाभर तिखट घालून घेतो. सर्वात शेवटी भरमसाठ चीज किसून ताकात शिजणाऱ्या पास्त्यामध्ये घालतो.

हेही वाचा : Viral video : ‘मोये मोये ऑमलेट’ हा कोणता नवीन पदार्थ? व्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा

सगळे मसाले घालून झाल्यावर, एका मोठ्या डावाच्या मदतीने हा पास्ता भराभर ढवळून घेतो. आता त्या ताकाला उकळी येत असल्याचे आपण पाहू शकतो. शेवटी पुन्हा शिजणाऱ्या पास्तामध्ये, पिझ्झा मसाला टाकून तो पास्ता ढवळतो. हा पदार्थ तयार झाल्यावर, एका फोम किंवा थर्माकॉलसारख्या बाऊलमध्ये ‘ताक-पास्ता’ खाण्यासाठी देतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर, ताक-पास्ता हा पदार्थ पाहून नेटकरी मात्र चांगलेच हैराण झाले असल्याचे त्यांच्या कमेंट्सवरून दिसते. नेटकऱ्यांचे या पदार्थाबद्दल नेमके काय मत आहे, पाहा.

“हा पदार्थ खाऊन माणसाला गंभीर आजार होऊ शकतात! पहिले म्हणजे, ही गोष्ट स्टायरोफोम [styrofoa] मध्ये खाण्यासाठी दिली जात आहे. २. ताक कोमट केले जाऊ शकते, पण त्याला उकळले तर त्याचे विषात रूपांतर होऊ शकते. ३. ताक आणि चीज अजिबात एकत्र करू नये. कृपया समाजाचा विचार करून अशा फालतू गोष्टी लोकांना खाऊ घालू नका”, अशी अतिशय खरमरीत प्रतिक्रिया एकाने लिहिली आहे. “हा पदार्थ विषापेक्षा कमी नाही”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. “त्या इटलीच्या माणसांनी हा व्हिडीओ पाहिला तर एवढे बडबडतील ना…. देवाला तरी घाबरा रे..” असे तिसऱ्याने म्हटले आहे. “अरे देवा… कुठून येतात अशी माणसं!” असे चौथा म्हणतो. तर शेवटी पाचव्याने, “गुजराती आणि इटालियन दोघांनाही एकाच वेळी नाराज केलंय याने” असे लिहिले आहे.

हेही वाचा : खाद्यप्रेमींसाठी नवा ‘Fusion’ पदार्थ होतोय व्हायरल; ढोकळ्यासह केलेल्या प्रयोगावर नेटकरी म्हणाले…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवरून @suratstreetfood नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत २९८K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.