scorecardresearch

Premium

कावळ्याने तुमच्या लहानपणीची ‘ती’ गोष्ट खरी करुन दाखवली, तळाला गेलेले पाणी पिण्यासाठी केलेला जुगाड एकदा पाहाच!

या कावळ्याची हुशारी पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. पाहा व्हिडिओ..

Crow Video
कावळ्याची हुशारी (Photo-twitter.com/gunsnrosesgirl3)

Crow Video: लहानपणी तहानलेल्या कावळ्याची गोष्ट तुम्ही अनेकदा वाचली किंवा ऐकली असेल. या कथेमध्ये एक कावळा होता, त्याला खूप तहान लागली होती. तो पाण्याच्या शोधात असतो. तेवढ्यात त्याला पाण्याचा एक माठ दिसतो. पण या माठात तळाशी पाणी असतं, मग ते पाणी पिण्यासाठी कावळा युक्ती लावतो. तो कावळा त्या माठात एक एक करुन खडे टाकतो. त्यामुळे ते पाणी वर येतं आणि मग तो पाणी पिऊन उडून जातो. हे सगळं आपण कथेमध्ये ऐकलं वाचलं. पण आता सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कावळा अगदी कथेतील कावळ्यासारखं पाणी पिताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा कावळा कथेतील कावळ्यासारखीच काॅपी करताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कावळा पाण्याच्या बाटलीकडे जातो. या बाटलीतील पाणी तळाशी गेलेले असते. पण हा हुशार कावळा खऱ्या आयुष्यात बाटलीतून पाणी पिण्यासाठी चक्क एक एक खडे टाकताना दिसतो. त्यामुळे पाण्याची पातळी वर येताना दिसते आणि त्यानंतर हा कावळा पाणी पिऊन आपली तहान भागवतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पूर्णपणे थक्क झाले आहेत. लहानपणी वाचलेली ही तीच कथा आहे, असे लोकांना वाटते.

mouthwash
श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका हवीये? मग घरी बनवलेल्या माउथवॉशने करा गुळण्या, तुमचा श्वास नेहमी राहील ताजा
Jugadu Women Made Sandwich Without Bread or Maida Use Dosa Batter In Toaster With Cheese Unique Breakfast Recipe Idea
डोक्याचा पूर्ण उपयोग! मैद्याच्या ब्रेडशिवाय बनवलं डोश्याचं क्लब सँडविच, तुम्हाला प्रयोग कसा वाटतोय बघा
mankind, earth, destruction, earth destruction marathi news
विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे फिरण्याचं शहाणपण मानवजात दाखवेल का?
Marathi Ukhane For Marriage
Ukhane : महिलांनो, उखाणे येत नाही? जाणून घ्या तुमच्या रावासांठी घ्या एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, लिस्ट एकदा पाहाच

(हे ही वाचा : खतरनाक! पिसाळलेला बैल थेट घरात शिरला; बायकांना उडवलं, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल )

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. gunsnrosesgirl3 नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला ७५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे, “हा कावळा खूप हुशार आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of clever crow using pebbles to reach water captures worldwide attention take a real life look at it pdb

First published on: 30-11-2023 at 15:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×