Viral Video : प्रेम हे प्रेम असतं. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. आपल्यावर खरं प्रेम करणारा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. तुम्ही आजवर अनेक लव्हस्टोरींविषयी ऐकले असेल. काही लव्हस्टोरी यशस्वी होतात आणि ते जोडपे लग्न करतात तर काही लव्हस्टोरी मात्र अपूर्ण राहतात त्यांचे ब्रेकअप होते.
आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करण्यासाठी घरच्यांना जोडीदाराविषयी सांगावं लागतं काहीवेळा घरचे एका शब्दात तयार होतात तर काही वेळा घरच्यांना मनवावे लागते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ११ वर्षाची लव्हस्टोरी पूर्ण होताना दिसत आहे. ११ वर्षाच्या प्रेमानंतर हे जोडपे लग्न करत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओत तुम्हाला एक स्टेज दिसेल. या स्टेजवर तुम्हाला दिसेल नवरदेव नवरी भावुक होताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव एका ठिकाणी बसून रडताना दिसत आहे. त्या नवरदेवासमोर नवरी उभी राहून रडताना दिसतआहे. तितक्यात कुटुंबातील काही महिला स्टेजवर येतात आणि नवरदेव नवरीला रडू नका, असे सांगतात आणि त्यांचे डोळे पुसतात. नवरदेव नवरीला भर स्टेजवर ढसा ढसा रडताना पाहून कोणीही भावुक होईल. या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने एकमेकांसाठी थांबत संघर्ष केला आहे. त्यांच्या लव्हस्टोरीला ११ वर्षे झाली आहे. आता ११ वर्षानंतर अखेर त्यांचं लग्न होत आहे. या सर्वात खास क्षणी हे जोडपं भावुक झाले आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ

_h3y_has4n या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” एकमेकांसाठी वाट पाहण्याच्या संघर्षाची ११ वर्षांची प्रेमकहाणी”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जेव्हा तुमची मेहनत, विश्वास, प्रेम आणि प्रामाणिकपणा जिंकतो..” तर एका युजरने लिहिलेय, “या पिढीत असा जोडीदार मिळायला नशीब लागतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरं प्रेम.. यांना देवाचा आशीर्वाद लाभो” एक युजर लिहितो, “खरं प्रेम कधीच संपत नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.