सध्या बहुतांश शाळांमध्ये लहान मुलांना मधल्या सुटीत खाऊ दिला जातो. मात्र, अनेकांच्या लहानपणी त्यांची आई त्यांना स्टीलच्या डब्यात पोळी-भाजी किंवा कोरडा खाऊ भरून द्यायची. हळूहळू त्या स्टीलच्या डब्यांमध्ये बदल होऊन, मुले विविध रंगांचे आणि आकारांचे डबे शाळेत घेऊन जाऊ लागली. इतकेच नव्हे, तर पाणी पिण्याच्या बाटल्यांमध्येही कितीतरी आकर्षक रंग आणि प्रकार मिळू लागले. मग मित्रांना दाखवण्यासाठी स्ट्रॉ असलेली बाटली किंवा झाकणावर मण्यांचा खेळ चिकटवलेली पाण्याची ‘फॅन्सी’ बाटली आपण हमखास घेऊन जायचो.
मात्र, सध्या सोशल मीडियावर एका महिलेले तिच्या मुलासाठी आणलेल्या पाण्याच्या बाटलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. खरे तर त्याला बाटली का म्हणावे, असा प्रश्न तुम्हाला व्हिडीओ बघून नक्कीच पडेल. अनेक नेटकऱ्यांनाही तो प्रश्न पडला आहे. आता हे सगळे वाचून, ‘या बाटलीमध्ये नेमकं काय आहे,’ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
हेही वाचा : ‘अरे हा January महिना संपता संपत नाहीये’… तुम्हालाही असे वाटते आहे का? जाणून घ्या काय असू शकते कारण?
तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये, एक स्त्री पर्ससारखा आकार असणारी काचेची बाटली आपल्याला दाखवते आणि ती तिने तिच्या मुलाला शाळेत नेण्यासाठी आणलेली आहे, असे लिहिलेल्या मजकुरावरून समजते. त्यानंतर त्या काचेच्या पर्सरूपी बाटलीत ती दोन-तीन चमचे भरून बर्फ घालते. त्यानंतर त्यामध्ये सरबत घालते आणि त्यात एक-दोन वेगवेळ्या प्रकारचे सिरप घालून, काही थेंब खायचा रंग घालून, सर्व सरबत स्ट्रॉने ढवळते. शेवटी त्यामध्ये लिंबाच्या फोडी आणि काही फळे घालून सरबत पिऊनही दाखवते. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
खरे तर हा मजा-मस्करी म्हणून शेअर केलेला व्हिडीओ असला तरीही अनेक नेटकऱ्यांना मात्र ही गंमत समजली नसून, या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या पाहा.
“काचेची उघडी बाटली आणि त्यामध्ये भरपूर साखर असलेले सरबत आणि खाण्याचा रंग घालून देणे हा त्या लहान मुलाला हायड्रेट ठेवण्याचा कोणता मार्ग आहे,” असा प्रश्न एकाने केला. दुसऱ्याने, “पाहिले, तर ही काचेची वस्तू आहे आणि तीदेखील उघडी. मुळात याला पाण्याची बाटली म्हणूच नये. ती पर्स स्वयंपाकघरात सजावट म्हणून वापरली गेली पाहिजे,” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “तो मुलगा खरंच हे शाळेत घेऊन जात नसेल, अशी अशा आहे,” असे म्हटले आहे. चौथ्याने, “मी इतकी मोठी असले तरी माझ्याकडून ती पर्स दोन दिवसांत फुटू शकते,” असे लिहिले आहे. शेवटी पाचव्याने, “बिचाऱ्या त्या लहान मुलाला शाळेत खूप चिडवले जाऊ शकते यावरून…” असे लिहिले आहे.
हेही वाचा : बापरे! Bentley गाडीमधून राजेशाही थाटात ‘या’ प्रवाशाला फिरवणे पडले महागात; हा व्हायरल व्हिडीओ पाहा
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @itsgoodbyetwenties नावाच्या हॅण्डलरने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २१.८ मिलियन इतके व्ह्युज मिळालेले आहेत.