सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशन आणि मेकअपचे विविध आणि अनोखे ट्रेंड पाहायला मिळतात. यात कधी संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप करण्यासाठी केवळ लिपस्टिकचा वापर कसा करायचा हे दाखवले जाते. तर कधी अजून काही. मात्र सध्या मेहेंदी मेकअपचे फॅड वाढत असल्याचे आपण पाहू शकतो. आता लग्नकार्य, साखरपुडा, पूजा किंवा कोणताही कार्यक्रम असल्यास आपण हातावर अत्यंत सुंदर नक्षी असणारी मेहेंदी हौसेने काढून घेतो. ओली मेहेंदी हातावर वाळल्यानंतर त्याचा गडद लाल किंवा काळसर रंग पाहायला खूपच सुंदर दिसतो.

मात्र तुम्ही हीच मेहंदी कधी ओठांवर किंवा डोळ्यावर मेकअप म्हणून लावल का? अनेकांचे उत्तर नाही असेच असेल.. मात्र सध्या मेहेंदीने संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप करायचा ट्रेंड आला असल्याचे दिसते. कारण इन्स्टाग्रामवरील the_sastamakeup नावाच्या अकाउंटने ते करूनदाखवले आहे. मात्र या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी या मेकअप हॅकला चांगलेच ट्रॉल केलेलं असल्याचे दिसते. नेमके व्हिडिओमध्ये काय आहे पाहू.

हेही वाचा : Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…

तर सुरवातीला, व्हिडिओमधील तरुणी मेहेंदीच्या कोनने आपल्या डोळ्यांवर मेहेंदी लावून घेते. नंतर भुवयांवर आणि ओठांना लिपस्टिकसारखी मेहेंदी लावते. तर शेवटी नाकाचा भाग आणि गालांवर छोटे-छोटे ठिपके काढते. मेकअप करताना ती तरुणी, “जर तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि तुमच्याकडे मेकअप उत्पादने नसतील. तर कुठेही बाहेर जायच्या एक दिवस आधी मेहेंदी चेहऱ्यावर ५ मिनिटांसाठी लावून ठेवा नंतर पाच मिनिटांनी ती धुवून टाका. मेकअप नैसर्गिक तर दिसलेच मात्र तो अजिबात निघून जाणार नाही.” अशी टीपदेखील देत आहे.

शेवटी ती एका टिशू पेपरच्या मदतीने चेहऱ्यावरील वाळलेली मेहेंदी पुसून टाकते आणि ओठांना चमक येण्यासाठी लीपबाम लावते. असे आपण व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकतो. मात्र ही हॅक जुनी असल्याचेही तरुणी सांगते. या मेकअपवर नेटकरी काय म्हणत आहेत ते पाहू.

“ही ट्रिक तुम्हीच वापरा.. आमच्याकडे आहेत मेकअपची उत्पादनं” असे एकाने लिहिले आहे. “असे काही करण्यापेक्षा मी मेकअपचं नाही करणार.” दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, “देवा एवढी गरिबी कुणालाही नको देऊ…” असे म्हंटले आहे. “कृपया मेहेंदी चेहऱ्याला लावू नका. ती आपल्या चेहऱ्यासाठी नाहीये.” असा सल्ला चौथ्याने दिला आहे. “अरे काय आहे हे सगळं? लोक दिवसेंदिवस वेडी होऊ लागली आहेत कि काय..” असे चिडून पाचव्याने लिहिले आहे.

हेही वाचा : Holi 2024: होळीला उधळा लाल, पिवळा निळा रंग! मात्र त्याआधी रंगांचे जाणून घ्या ‘हे’ अर्थ…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @the_sastamakeup नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत याला ४.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.