Pune Viral Video : पुणेरी पाट्या हा नेहमी चर्चेचा विषय असतो. पुणेरी पाट्यांविषयी तुम्ही अनेकदा वाचले असेल किंवा ऐकले असेल. पुण्यातल्या पाट्या म्हणजेच पुणेरी लोकांची मार्मिक टिप्पणी असते. सहसा हा एक सुचना फलक असतो ज्यावर एखादी सुचना अत्यंत खोचक शब्दात व मजेशीरपणे लिहिलेली असते. आता सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड आला आहे. काही तरुण मंडळी पाटीवर कधी मजेशीर तर कधी विचार करण्यास भाग पाडणारे संदेश लिहितात आणि ही पाटी हातात घेऊन रस्त्यावर उभी राहतात. जेव्हा येणारे जाणारे त्या पाटीकडे बघून प्रतिक्रिया देतात, तेव्हा ते क्षण कॅमेऱ्यात कैद करतात. पण सध्या एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये आंबा विक्रेत्याने ग्राहकांसाठी एक जबरदस्त मेसेज पाटीवर लिहिलाय. नेमका काय मेसेज आहे, जाणून घेऊ या.

या व्हिडीओमध्ये या आंबा विक्रेत्याने एक मजेशीर पण तितकाच सुंदर संदेश या पाटीवर लिहिलाय. या विक्रेत्याने नेमकं काय लिहिलेय, हे आज आपण जाणून घेऊ या.

सध्या आंब्याचे सिझन सुरू आहे. घरोघरी आंबे, आंब्याचा रसाचा आस्वाद घेतला जात आहे. अशात आंब्याचे भाव गगनाला भिडले आहे. ग्राहक आंबे खरेदी करताना भाव करतात, कमी दरात मागतात. अशा ग्राहकांसाठी या आंबा विक्रेत्याने पाटीवर एक मेसेज लिहिलाय. या मेसेजवर लिहिलेय, “हापूसचा जर भाव केला तर पायरी दाखवण्यात येईल.” या पाटीकडे बघून लोक हसताना दिसत आहे. काही या व्हिडीओवर सहमती दर्शवत आहे. एक काका हसत विचारतात, “आंब्याची पायरी की माणसाची पायरी?”

हापूस आंबा हा फळांचा राजा आहे. गोडसर चव आणि रसरशीत पोत असलेला हा आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. या फळांच्या राजाचा भाव करू नका, नाहीतर पायरी दाखवली जाईल म्हणजेच लायकी दाखवली जाईल तसेच पायरी म्हणजे ही आंब्याची एक लोकप्रिय जात आहे, ज्याचा दर हापूसपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे पायरी हा शब्द दुहेरी अर्थाने येथे वापरला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

posterwala_ganyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हापूसचा भाव केला तर.. आंबा स्पेशल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.