नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग हे सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर ते नेहमी काहीतरी मजेशीर गोष्टी शेअर असतात. तसचे नागालँडच्या पर्यटनाला चालना देण्याची एकही संधी ते सोडत नाही. यााआधीही अलॉन्ग यांनी नागालँडमधील पर्यटनाचा प्रचार करण्यासाठी चित्रपट अभिनेता सनी देओलची व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. तसेच त्यांनी कोहिमा येथील पर्वतांचे अविश्वसनीय दृश्य दाखवणारा व्हिडिओदेखील शेअर केला होता. यावेळी नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काय आहे हा व्हिडिओ क्लिप सविस्तर जाणून घ्या

तेमजेन यांनी शेअर केला नागालँडमधील गावाचा सुंदर व्हिडिओ

सोमवारी नागालँडचे मंत्री तेमजेन अलॉन्ग यांनी आपल्या ट्विटरवर एक नयनरम्य व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात झापामी या गावातील सुंदर दृश्य दिसत आहे. हे गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून जवळपास ५३ किमी दूर आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अलॉन्ग यांनी कॅप्शनमध्ये लिहले की, एक असा प्रवास जो आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो आणि समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतो..”

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओमध्ये कसे छोटे गाव दिसत आहे जे पायऱ्या-पायऱ्यांच्या भाताच्या शेतांनी वेढलेले आहे आणि स्थानिक पातळीवरील वारसा संग्रहालयामार्फत त्याचा इतिहास जतन केला आहे. व्हिलेज हेरिटेज म्युझियम केवळ स्थानिक लोकांच्या कलाकुसरीचेच प्रदर्शन करत नाही तर दुसऱ्या महायुद्धातील अवशेष देखील दर्शवितो.’

हेही वाचा – मोनिका, जोई, चँडलर, रॉस, फिबी, रेचल….’फ्रेंडस’मधील तुमच्या लाडक्या पात्रांचे बालपणीचं गोंडस रुप पाहिलं का? पाहा व्हायरल फोटो

अलॉन्गने शेअर केलेली क्लिप फूड आणि ट्रॅव्हल व्लॉगर द ब्रोक ट्रॅव्हलर (@Modun_) ने बनवलेल्या १५ मिनिटांच्या YouTube व्हिडिओवरून घेतली आहे. नागालँड टुरिझमच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओदेखील हा शेअर केला होता. ” झापामी गावाला भेट देणे हा एक अनोखा ऐतिहासिक अनुभव आहे जो आपल्याला स्वदेशातील समृद्ध इतिहास दर्शवितो आणि आपल्याला आपली मुळे जपण्याची परवानगी देतो.” असे कॅप्शनमध्ये लिहिले होते.

हेही वाचा – Video: बंजी जंपिगदरम्यान हवेतच तुटली दोरी, थरारक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करतायेत तेमजेन

जानेवारीमध्ये अलॉन्ग यांनी भारत आणि म्यानमारच्या मध्यात येणाऱ्या नागालँडमधील एका अनोख्या घराविषयी असाच व्हिडिओ शेअर केला होता. लोंगवा गावात असलेल्या या घराची झोपण्याची जागा भारतीय हद्दीत आहे, तर स्वयंपाकघर क्षेत्रासारख्या इतर खोल्या म्यानमारमध्ये आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागालँड पर्यटनासाठी सातत्याने चालणा देण्यासह, मंत्रीअँलॉन्ग यांनी जबाबदार प्रवासी वर्तनाबद्दल देखील ट्विट केले होते. मार्चमध्ये, त्यानी शिमल्यात घेतलेला एक फोटो शेअर केला होता, ज्यात अर्ध्या तुटलेल्या दारूच्या बाटल्या रस्त्यावर टाकून दिल्या होत्या. हे फोटो शेअर करताना त्यांनी लोकांना स्थानिक आदरातिथ्याचा गैरवापर न करण्याचे आवाहन केले आणि पर्यटकांना कचऱ्याची जबाबदारीने विल्हेवाट लावण्याची विनंती केली.