शहरांमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत तत्परतेने काम करत असतं. अनेक शहरांमधील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडत असतात. तर काही पोलिस मात्र लाच घेणारे आणि कायद्याचं उल्लंघन करताना आढळतात. सध्या अशाच एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी ड्युटीवर असतानाच एका टपरीमध्ये दारु पित बसल्याचं दिसत आहे. शिवाय अंगावर खाकी वर्दीत दारु पिणाऱ्या पोलिसाला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच दारु पिणाऱ्या पोलिसाची चौकशी करत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा- दोन तोंड, तीन पायांचा ‘हा’ कसला विचित्र प्राणी? व्हायरल Video पाहून नेटकरी झाले थक्क

उघड्यावर दारु पित होता हवालदार –

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील हरदोई येथील असल्याची माहिती समोर आली आहे.या ठिकाणी ड्युटीवर असलेला एक पोलिस हवालदार रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या एका दुकानात उघड्यावर दारू पिताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा पोलिस दारु पितानाचा व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तीलाच पोलिस दमदाटी करताना व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- फळे, भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात जाता? तर मग ग्राहकाच्या फसवणूकीचा हा Video बघाच

नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या पोलिसाचे नाव शैलेंद्र सिंह चौहान असून तोयासोबतच तो वाहतूक उपनिरीक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसाच्या या गैरकृत्याचा व्हिडिओला एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो कमेंट या व्हिडीओवर येत असून ड्युटीवर असताना मद्यपान करणाऱ्या पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.