Viral Video : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर नातं असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आणि आपुलकी दिसून येते. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचे विशेष स्थान आहे. बालपणीची मैत्री, शाळेतील मैत्री, कॉलेजातील मैत्री, प्रत्येक मैत्री आपल्याला आयुष्याच्या टप्प्यावर सांभाळत असते आणि जपत असते काही मैत्री ही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोबत असते. असं म्हणतात जितकी जुनी मैत्री , तितकी व्यक्ती श्रीमंत असते. जर तुमचे आजही जुने मित्र असतील तर तुम्ही सर्वात श्रीमंत आहात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध मित्र दिसत आहे. हे मित्र एकमेकांचे फोटो काढताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

कोल्हापूरच्या वृद्ध मित्रांनी जिंकले सर्वांचे मन

हा व्हायरल व्हिडीओ कोल्हापुरातील रंकाळा येथील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन वृद्ध मित्र दिसतील. हे दोघेही एकमेकांचे मोबाईलमध्ये फोटो काढताना दिसत आहे. फोटो काढल्यानंतर ते मोबाईलमध्ये फोटो कसे काढले हे बघताना सुद्धा दिसतात. चिमुकले, तरुण मंडळींमध्ये तुम्ही आजवर अशी मैत्री पाहीली असेल पण म्हातारापणात मैत्री जपणारे हे दोन मित्र पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला कोल्हापुरातील रंकाळा जवळचा संपूर्ण परिसर दिसेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “कोल्हापूर, भावा इथपर्यंत साथ पाहिजे”

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

हेही वाचा : “एका महिन्याच्या आत तिकिटाचे पैसे देते” एसटी बसमध्ये महिला प्रवासीने कंडक्टरबरोबर घातला वाद, VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : आणखी काय हवं? नवऱ्याने खेळ जिंकण्यासाठी बायकोची केली अशी मदत की… VIRAL VIDEO जिंकतोय सगळ्यांचे मन

maxxicapez या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “रंकाळ्या वरील फालतू व्हिडीओ पेक्षा हा व्हिडिओ कीती तरी पटीने भारी आणि एक चांगला संदेश देणारा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “जगात भारी कोल्हापुरी उगच म्हणतं नाहीत भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही म्हणायची खरी मैत्री” एक युजर लिहितो, “एक चांगला संदेश देणारा व्हिडिओ केला आहे खूप मस्त.मैत्री अशी असावी…” तर एक युजर लिहितो, “मित्रासाठी घासातला घास काढून ठेवण सोपं असतं..मित्रासाठी जीव देणं पण खूप सोपं असतं पण….
जीव देण्याइतका चांगला मित्र भेटणं खरंच खूप अवघड असतं..!” तर एक युजर लिहितो, “दोघेही खुप नशिबवान आहेत” अनेक युजर्सनी मैत्रीवर विचार मांडले आहेत.

Story img Loader