Viral Video : लग्न म्हणजे एक सोहळा असतो. घरात एखाद्याचं लग्न आहे असलं की जय्यत तयारी सुरू होते. डेकोरेशन, कपडे दागिन्यांची खरेदी, मिठाई, फूड मेन्यू इत्यादी. लग्नाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी लग्नपत्रिका छापल्या जातात. लोक त्यांच्या आवडीनुसार लग्न पत्रिका तयार करतात. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या हटके लग्नाच्या पत्रिका व्हायरल होतात. सध्या अशीच एक लग्नाची पत्रिका चर्चेत आली आहे. ही लग्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला क्षणभरासाठी वाटेल की आपण हातात लग्नाची पत्रिका नाही तर फोन धरला आहे आणि व्हॉट्सअप बघत आहोत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
लग्नपत्रिका की व्हॉट्सअप चॅट ?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नाचे कार्ड बनवले आहे आणि ते पण हुबेहुब स्मार्टफोनच्या आकाराचे. या कार्डला लाल रिबनमध्ये बांधले आहे. रिबन उघडल्यानंतर समोर मोबाइल स्क्रिन दिसते. त्यावर वेळ लिहिलेली दिसत आहे आणि लेहेंगा घातलेल्या दोन सुंदर मुलीचे अॅनिमेटेड चित्र दिसत आहे. जेव्हा कार्ड उघडले जाते तेव्हा डाव्या बाजूला वर वधूचे नाव, लग्नाची तारीख आणि इतर माहिती व्हॉट्सअप चॅटच्या स्टाइलमध्ये लिहिली आहे. कार्डच्या उजव्या बाजूला गूगल मॅप दिला आहे. त्यावर लग्नाचे स्थळ दर्शवण्यात आले आहे, जेणेकरून लग्नस्थळी पाहुण्यांना कोणताही त्रास होणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Video)
sonu_muskiwala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्नाची अशी पत्रिका तुम्ही कधीही पाहिल नसेल.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कुठे बनवून मिळते हे कार्ड.. दुकानदाराचा नंबर पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “मला असं कार्ड बनवायचं आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर मला खूप आवडलं” अनेक युजर्सना हे कार्ड खूप आवडले. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. जवळपास दोन लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.