पावसाळ्यात वर्षाविहार करण्यासाठी अनेक लोक धबधबे किंवा धरणाच्या ठिकाणी भेट देतात. पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. रविवारी लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला. हा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्वप्नील धावडे असे या तरुणाचे नाव आहे. स्वप्नील जिममधील ३२ लोकांच्या ग्रुपबरोबर शनिवारी ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीला येथे आला होता. दरम्यान स्वप्नीलने उंचावरून धबधब्यात उडी मारली पण पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो अडकला आणि वाहून गेला.

सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर @sirajnooraniनावाच्या खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वप्नील धबधब्यात उडी मारताना दिसतो. पाण्याचा जोरदार प्रवाहामध्ये तो अडकतो. त्यानंतर धबधब्याच्या बाजूला असलेल्या खडकांना पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पोहण्याचा प्रयत्न करूनही तो पाण्याच्या प्रवाहाबरोब वाहून जाताना दिसत आहे. तातडीने शोध घेण्याचे प्रयत्न करूनही स्वप्नील अद्याप बेपत्ता आहे.

हेही वाचा – लोणावळा: ‘त्या’ धबधब्याच्या प्रवाहातून १० पैकी पाच जण सुखरूप वाचले, वाहून गेलेल्या ५ जणांपैकी तिघांचा मृत्यू

हेही वाचा – VIDEO : लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले! महिला आणि दोन मुलींचा मृतदेह मिळाला, दोन चिमुकल्यांचा शोध सुरू

अशाच एका घटनेत रविवारी दुपारी एका प्रसिद्ध पर्यटन स्थळी पाण्याची पातळी अचानक वाढल्याने कुटुंबातील पाच जण वाहून गेले. लोणावळ्यातील भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये तीन मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आणि कुटुंब पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकले. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात पर्यटनस्थळी स्वत:ची आणि कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची

पावसाळ्यात सुंदर धबधबे पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण अशा ठिकाणी भेट देताना प्रथम आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे असते. सुरक्षित धबधब्याचे ठिकाण शोधा जिथे रेलिंग असेल, धोका दर्शवणारी चिन्हे असतील आणि आपात्कालिन स्थितीमध्ये जीवरक्षक आणि आवश्यक सुरक्षेचा गोष्टी उपलब्ध असतील. धबधब्याजवळ आल्यानंतर आधिकऱ्यांनी सांगितलेल्या कोणत्याही धोक्याच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करू नका आणि सावधगिरी बाळगा. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. स्वत:ची आणि कुटुंबाचा जीव धोक्यात जाईल अशी कृती करू नका, अशा काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून तुम्ही स्वत:ला आणि कुटुंबाला सुरिक्षत ठेवू शकता.